आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Assembly Election, Gujarat Results | Assembly Election Results 2022, AIMIM Fail In Gujrat  

गुजरात निवडणुकीत AIMIMचा पतंग कटला:काँग्रेस-भाजपच्या बालेकिल्ल्यात एमआयएमचा दारूण पराभव; सर्व उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त

अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये तिरंगी लढाई पाहायला मिळाली, कारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यात चुरस दिसून आली. या निवडणुकीत ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने 13 उमेदवारांसह निवडणूक लढवली, त्यापैकी 2 उमेदवार हिंदू होते.

आज निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवारांच्या डिपॉझिट देखील जप्त झाले आहे. एमआयएमचा पतंग गुजरातमध्ये चालू शकला नाही. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

AIMIM पक्षाने 14 उमेदवारांसह निवडणूक लढवली

मांडवी जागेवर वकील मोहम्मद इक्बाल मंजालिया, भुज जागेवर सकील मोहम्मद, सुरत पूर्व जागेवर वसीम इक्बाल खोकर, खंभलिया जागेवर बुखारी याकुब मोहम्मद, मंगरूळ जागेवर सुलेमान पटेल, लिंबायत जागेवर अब्दुल बशीर शेख, गोध्रा जागेवर हसन शब्बीर कचबा, वेजलपूर जागेवर झैनाब शेख, दर्यापूर मतदारसंघातून हसन खान समशेरखान पठाण, जमालपूर-खाडिया मतदारसंघातून साबीर काबलीवाला, दानीलिमडा मतदारसंघातून कौशिकाबेन परमार, वडगाम (एससी) जागेवर कल्पेश सुधिया आणि सिद्धपूर मतदारसंघातून अब्बास मोहम्मद शरीफ नोडसोला यांना तिकीट देण्यात आले.

मुस्लिम मतदारांमध्ये AIMIM विरोधात नाराजी
एआयएमआयएमने प्रथमच संपूर्ण तयारीसह 14 जागांवर उमेदवार उभे केले. यात दोन हिंदू आणि 12 मुस्लिमांना तिकीट दिले होते. मात्र, एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. या 14 जागांपैकी काँग्रेसकडे 8 तर भाजपकडे 6 जागा होत्या.

एआयएमआयएमच्या प्रवेशाने या सर्व जागांची समीकरणे उलटू शकली असती, पण गोध्रापाठोपाठ अहमदाबादमध्येही ओवेसींच्या पक्ष एआयएमआयएमविरोधात मुस्लिम मतदारांमध्ये नाराजी दिसून आली. गेल्या वर्षी झालेल्या गोध्रा नगरपालिका निवडणुकीत एआयएमआयएमने सात जागा जिंकल्या आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अपक्षांशी युती केली हे त्यामागचे कारण होते. अपक्ष संजय सोनी फेब्रुवारी 2021 मध्ये ओवेसी यांच्या पक्षाच्या पाठिंब्याने नगरपालिकेचे अध्यक्ष झाले, परंतु भाजपचा पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये AIMIM सोडले.

मुस्लिम मतदारांनी ओवेसी गो बॅकच्या घोषणा
​ ​​​​​AIMIM केवळ मतांचे विभाजन करण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मग या निवडणुकीतही एआयएमआयएम केवळ मतांचे विभाजन करण्यासाठी लढत असल्याची चर्चा मुस्लीम मतदारांमध्ये होती, ज्याचा थेट फायदा भाजपलाच होणार आहे. यासंदर्भात अहमदाबादच्या शाहपूर मिल कंपाऊंडमध्ये मुस्लिम मतदारांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला आणि ओवेसींनी गो बॅकच्या घोषणा दिल्या. यासोबतच ओवेसी गो बॅकचे फलक लावण्यात आले होते. मात्र, याआधी गोध्रामध्ये ओवेसींचा पक्ष एआयएमआयएमचाही या पद्धतीने विरोध करण्यात आला होता.

एआयएमआयएमच्या गुजरात अध्यक्षांवर आरोप झाले
AIMIM पक्षाचे समन्वयक आणि गुजरात उच्च न्यायालयाचे वकील के. आर कोष्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन एआयएमआयएमचे अध्यक्ष साबीरभाई काबलीवाला यांच्यावर आरोप केला. ते म्हणाले की, साबीरभाईंना भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. ते असुद्दीन ओवेसी यांच्याशी आठवड्यातून तीन वेळा बोलतात, परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याशी दिवसातून तीन वेळा बोलतात. एआयएमआयएम पक्षाची विचारधारा ही मुस्लिम नेतृत्व निर्माण करण्याची आहे. पण साबीर काबलीवाला ज्या पद्धतीने काम करतात, त्यामुळे मुस्लिम नेतृत्व निर्माण होणार नाही, उलट मुस्लिम मतांचे सौदे होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...