आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात राजकीय भूकंपांचे केंद्र:रिसॉर्ट राजकारण व बंडखोरांचे केंद्रस्थान बनले, प्रथम राजस्थान आता मराठी आमदार आश्रयाला

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रिसॉर्ट राजकारण व बंडखोरीमध्ये गुजरात नेहमीच आघाडीवर राहिले. अन्य राज्यांतील सरकार पाडण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी आमदारांना गुजरातला हलवण्याची परंपरा काही नवी नाही. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 20 हून आमदार सोमवारी सायंकाळी नॉट रिचेबल झाले. त्यानंतर अचानक ते सूरतच्या 'ला मेरिडियन' हॉटेलात अवतरले. यापूर्वी 2020 मध्ये येथे राजस्थानच्या भाजप आमदारांना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी गुजरातला आणण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या 2 वर्षांतच गुजरात रिसॉर्ट राजकारण व आमदारांच्या बंडखोरीचे केंद्रस्थान बनले आहे. आता महाराष्ट्रातील आमदारांना गुजरातमध्ये हलवण्यात आले आहे.

2020 मध्ये राजस्थानातील भाजप आमदारांचा आश्रय

ऑगस्ट 2020 मध्ये राजस्थानच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली. तेव्हा भाजपने आपल्या आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी गुजरातच्या रिसॉर्टची मदत घेतली होती. त्यांना विशेष विमानाने गुजरातला हलवण्यात आले होते. त्यांना प्रथम पोरबंदर व नंतर सासनच्या विविध रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट समर्थक आमदारांनाही अहमदाबाद लगतच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते.

गहलोत यांच्या भीतीमुळे 2020 मध्ये राजस्थान भाजपचे आमदार गुजरातला हलवण्यात आले होते.
गहलोत यांच्या भीतीमुळे 2020 मध्ये राजस्थान भाजपचे आमदार गुजरातला हलवण्यात आले होते.

काँग्रेस आमदारांना 2017 ते 2020 पर्यंत 3 वेळा अन्य राज्यांत हलवले

गुजरातमधील 2017 च्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या 42 आमदारांना बंगळुरूच्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले होते. 2019 मध्ये पुन्हा एकदा राज्यसभेच्याच निवडणुकीवेळी काँग्रेस आमदारांना पालनपूरमधील एका रिसॉर्टमध्ये नेण्यात आले. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या 2020 च्या निवडणुकीवेळीही काँग्रेसच्या आमदारांना उदयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्याची वेळ आली होती.

2020 च्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आमदारांना राजस्थानच्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले होते.
2020 च्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आमदारांना राजस्थानच्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले होते.

शंकरसिंह वाघेलांनी सुरू केले रिसॉर्ट राजकारण

शंकरसिंह वाघेला यांनी 1995 मध्ये गुजरातमध्ये रिसॉर्टचे राजकारण सुरू केले. त्यांनी गुजरातचे केशुभाई पटेल यांचे भाजप सरकार पाडण्यासाठी 40 हून अधिक आमदारांसह बंडखोरी केली. सर्वांना खजुराहो येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर केशुभाईंचे सरकार कोसळले.

1995 साली गुजरातमध्ये केशुभाईंच्या नेतृत्वात पहिल्यांदा भाजप सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी भाजपच्या बंडखोर उमेदवारांना प्रथम वाघेलाचा बालेकिल्ला असणाऱ्या वासनात ठेवण्यात आले होते. त्यानंतर 25 हून अधिक वाहनांद्वारे त्यांना अहमदाबाद विमानतळावर हलवण्यात आले.

विमानतळावर पोहोचल्यानंतर आमदारांनी 'आम्हाला कुठे घेऊन जात आहात', असा प्रश्न केला. त्यावेळी आमदारांकडे अंगावरील कपड्यांशिवाय दुसरे काहीच नव्हते.