आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदाराचा राजीनामा:गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; भरुचचे खासदार मनसुख वसावा यांची पक्षाला सोडचिठ्ठी

भरुचएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वसावा यांन गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना पत्राद्वारे राजीनामा सुपूर्द केला

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. राज्यातील भरुच मतदारसंघातील खासदार आणि जेष्ठ भाजप नेते मनसुख वसावा यांनी राजीनामा दिला आहे. भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना पत्राद्वारे त्यांनी लवकरच संसदेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे.

वसावा यांनी प्रदेशाध्यक्शला लिहीलेल्या पत्रात म्हटले की, 'मला भाजपने माझ्या क्षमतेपेक्षा जास्त दिले. पण, माझ्या काही चुकांमध्ये पक्षाचे नुकसान होत आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे.' तसेच, 'माझी आजपर्यंतची वाटचाल पक्षाची मूल्य आणि आदर्शाला अनुसरून होती. मी एक सामान्य माणूस आहे. मात्र, आदिवासींशी संबंधित असलेल्या काही मुद्द्यांवरुन पक्षासोबत असलेल्या मतभेदांमुळे आपण भाजपमध्ये राहू शकत नाही', असेही वसावा यांनी पत्रात नमुद केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser