आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Gujarat Cabinet Expansion New Ministers List Update; CM Bhupendra Patel | Vijay Rupani Minister

गुजरातमध्ये उद्या मंत्रिमंडळ विस्तार:नव्या मंत्र्यांना दिली जाणार शपथ; रुपाणी मंत्रिमंडळात सामिल असलेले सर्व दिग्गज बाहेर पडतील, 27 आमदार होतील मंत्री

अहमदाबाद3 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी दुपारी दीड वाजता होणार आहे. यामध्ये सर्व जुन्या मंत्र्यांना हटवले जाईल. 27 नवीन आमदारांना मंत्री केले जाईल. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या दोन दिवसांनी आज मंत्रिमंडळाची स्थापना होणार होती, परंतु, त्याआधी काही सहकारी नाराज असल्याचे सांगण्यात आले.

आधी दुपारी 2 वाजता होणारा कार्यक्रम संध्याकाळसाठी पुढे ढकलण्यात आला. आता गुरुवारी दुपारी 1:30 वाजता असेल. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे भूपेंद्र पटेल यांच्या नवीन टीमबद्दल नाराज असल्याचे बोलले जाते.

वास्तविक, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना नवीन संपूर्ण मंत्रिमंडळ हवे आहे. मंत्रिमंडळात महिलांची संख्याही वाढवता येऊ शकते. विजय रुपाणी सरकारमधील 11 कॅबिनेट मंत्र्यांपैकी केवळ दिलीप ठाकूर, गणपत वसावा आणि जयेश रादडिया यांचाच नव्या मंत्रिमंडळात समावेश होणे अपेक्षित आहे.

जातीय समीकरणेही विचारात घेतली जातील
भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणतात की भूपेंद्र पटेल हे नवे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या टीममध्येही नवीन सदस्य असतील. आधी सांगितले जात होते की त्यांच्या मंत्रिमंडळात काही वरिष्ठ मंत्री असतील, पण आता तसे वाटत नाही. त्याचबरोबर जात आणि प्रदेश यांची समीकरणेही विचारात घेतली जातील. 22 किंवा 25 सदस्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याऐवजी 27 सदस्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ स्थापन होणे अपेक्षित आहे.

या आमदारांना मंत्री केले जाऊ शकते

 • निमाबेन आचार्य- भूज
 • जगदीश पटेल- आमराईवाडी
 • शशिकांत पंड्या - दीसा
 • ऋषीकेश पटेल- विसनगर
 • गजेंद्रसिंह परमार-प्रांतिज
 • गोविंद पटेल- राजकोट
 • आर सी मकवाना- महुवा
 • जीतू वाराणी - भावनगर
 • पंकज देसाई - नडियाद
 • कुबेर दिंडोर- संतरामपूर
 • केतन इनामदार - सावळी
 • मनीषा वकील- वडोदरा
 • दुष्यंत पटेल - भरुच
 • संगीता पाटील - सुरत
 • नरेश पटेल - गणदेवी
 • कनुभाई देसाई - पारडी
बातम्या आणखी आहेत...