आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:हायवेवर ट्रक-कारची समोरासमोर जोरदार धडक, एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

गांधीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये बुधवारी एक भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला. यात 2 मुले आणि 2 महिलांचा समावेश आहे. अपघात आणंद जिल्ह्यातील तारापूर हायवेवर सकाळी 6:20 वाजता झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कार हायवेवरुन खूप वेगाने जात होती. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरुन येणाऱ्या ट्रकवर कार आदळली. या भीषण अपघातात कारचा चुरा झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवून त्यांच्या नातलगांना सूचना देण्यात आली आहे. सर्व मृतदेहांना पोस्ट मॉर्टमसाठी पाठवले आहेत. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...