आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शनिवारी रात्री वडोदरामध्ये एका सभेदरम्यान त्यांना चक्कर आली होती. वडोदरामध्ये सुरुवातीचे उपचार केल्यानंतर त्यांना अहमदाबादच्या UN मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. ज्याचा रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेत्यांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. हॉस्पिटलने म्हटले की, सध्या त्यांची तब्येत ठिक आहे.
LIVE - વડોદરા ખાતે આગામી સ્થાનિક સ્વરાજ્યની ચૂંટણી અંતર્ગત આયોજિત જાહેરસભા#ગુજરાત_મક્કમ_ભાજપ_અડીખમ https://t.co/i7uZZhLLim
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) February 14, 2021
सभेदरम्यान बीपी झाला होता लो
गुजरातमध्ये फेब्रुवारीच्या अखेरिस महापालिका निवडणुका होणार आहे. यामुळे विजय रुपाणी निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. शनिवारीही ते ववडोदरामध्ये एका संबोधित करत होते. यादरम्यान त्यांचा बीपी लो झाल्यामुळे त्यांना चक्कर आली होती. आरोग्य बिघडल्यामुळे त्यांनना अहमदाबाद येथे आणण्यात आले होते.
गुजरातच्या या शहरांमध्ये होणार आहेत निवडणुका
गुजरातच्या अहमदाबाद, सूरत, राजकोट, वडोदरा, जामनगर आणि भावनगर येथे महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. 21 फेब्रुवारीला येथे मतदान होणार आहे. मतमोजणी 23 फेब्रुवारीला होील. राज्याच्या 31 जिल्हा पंचायत, 231 तहसील पंचायत आणि 81 नगर पालिकांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान होईल आणि मतमोजणी 2 मार्चला होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.