आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhupendra Patel Son Undergoes Operation; After Suffering Brai Stroke | BJP | Gujarat

उपचार:गुजरात CM च्या एकुलत्या एका मुलाला ब्रेन स्ट्रोक; 37 वर्षीय अनुजला हवाई रुग्णवाहिकेने मुंबईला हलवले, भूपेंद्र पटेलही सोबत

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (उजवीकडे) व त्यांचा 37 वर्षीय मुलगा अनुज पटेल. - Divya Marathi
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (उजवीकडे) व त्यांचा 37 वर्षीय मुलगा अनुज पटेल.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अनुज या एकुलत्या एक मुलाला ब्रेन स्ट्रोकमुळे अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला पुढील उपचारासाठी सोमवारी सकाळी हवाई रुग्णवाहिकेने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले. सीएम पटेलही आपल्या मुलासोबत मुंबईत पोहोचलेत.

37 वर्षीय अनुज पटेल यांना रविवारी दुपारी 3 वा. ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना तातडीने अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.

अनुज व्यावसायिक सिव्हिल इंजिनिअर आहे. त्यांचा अहमदाबादमध्ये बांधकाम व्यवसाय आहे.

अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये रविवारी अनुज पटेल यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये रविवारी अनुज पटेल यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

राज्यपाल - प्रदेशाध्यक्षांची रुग्णालयात धाव
अनुजच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत व भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील हे सोमवारी सकाळीच केडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांच्या उपस्थितीत अनुजला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आपल्या मुलासह मुंबईला रवाना झालेत.

मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अनुजवर पुढील उपचार केले जातील.
मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अनुजवर पुढील उपचार केले जातील.

गुजरात गौरव दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपाल हजर
आज गुजरात गौरव दिनानिमित्त संपूर्ण गुजरातमध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सीएम भूपेंद्र पटेल जामनगरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण आता ते या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यांच्या जागी राज्यपाल आचार्य व आरोग्य मंत्री हृषिकेश भाई पटेल या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.