आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदाराचे कांती खराडी यांनी भाजपवर धक्कादायक आरोप केले आहेत. आपल्यावर भाजपा उमेदवार लाधू पारघी, लालकृष्ण बराड आणि वदनजी अशा 150 लोकांनी मिळू हल्ला केल्याचे म्हटले.
रात्री 9.30 च्या सुमारास आपल्या मतदारांकडे जात असताना त्यांची गाडी थांबवून मला घेरण्यात आले. हल्लेखोरांनी तलवारी आणि इतर हत्यारे आणली होती. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण मी कसा तरी जीव मुठीत घेऊन पळून जाण्यात यशस्वी झालो आणि तीन ते चार तास जंगलात लपून राहिलो, असे खराडी यांनी सांगितले. कांती खराडी हे गुजरातमधील बनासकांठा येथील राखीव दंता जागेवरून काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार आहेत.
सुरक्षा मागितली असता नकार दिला
यापूर्वीही भाजपच्या उमेदवाराकडून आपल्याला धमकावल्याचा दावाही आमदार खराडी यांनी केला. यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला 4 दिवस अगोदर पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. मात्र ती नाकारण्यात आली होती. त्या पत्रानंतर कारवाई झाली असती तर आज हा हल्ला झाला नसता, असे ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले- ना घाबरतो ना घाबरणार
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही रविवारी रात्री उशिरा ट्विट करून खराडी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते की, खराडी यांच्यावर भाजपने हल्ला केला आणि आता ते बेपत्ता झाले आहेत. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निमलष्करी दल तैनात करण्याची मागणी केली होती. मात्र आयोग झोपेत आहे. भाजपने लक्षात ठेवावां की आतापर्यंत आम्ही घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. तसेच खंबीरपणे लढा देऊ.
पराभवाच्या भीतीने हल्ला केला
गुजरात काँग्रेसचे नेते जिग्नेश मेवाणी यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भाजपला पराभवाची भीती असल्याने खराडीवर हल्ला करण्यात आला. त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. उत्तर आणि मध्य गुजरातमधील 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 25 दशलक्ष मतदार 833 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.