आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gujarat Corona Lockdown News Stories Updates; Police Found Dead Body Of Child In Unclaimed Condition, Father Kills His Nine Month Old Daughter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात:या बातमीला शीर्षक देण्याची आमच्यात हिम्मत नाही, तुम्ही स्वतः वाचा....

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पहिली घटना

वरच्या फोटोमध्ये नमस्काराच्या मुद्रेत दिसणारा चिमुकला गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भाभर तालुक्यातील मेरा गावातील आहे. हा रस्त्याने जाणाऱ्यांना रस्त्यावर आढळला. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, हे बाळ मरण पावले होते.  45 डिग्री कडक उन्हात निर्दयी माय-बापाने या चिमुकल्याला रस्त्यात फेकून पळ काढला. पोलिसांनी अज्ञात पालकांविरोधात गुन्हा नोंद करुन, शोध सुरू केला आहे.

दुसरी घटना

बाळाच्या रडल्याने झोपमोड झाल्याच्या रागात निर्दयी बापाने आपल्या 9 महिन्यांच्या पोटच्या पोरीची निर्घृणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना सूरतजवळील सलाबतपुरामध्ये सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी आरोपी वडील उवेश हसन शेखने चिमुकलीच्या डोक्यावर आणि छातीवर जोराने बुक्क्या मारल्या आणि नंतर जमिनीवर आदळून मुलीचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...