आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gujarat Coronavirus Lockdown News Latest Updates; Migrants Workers And Police Clash In Ahmedabad, Migrant Workers In Ghaziyabad, Migrants Workers In Sonipat Haryana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन संकट:गुजरातमध्ये पाचव्यांदा प्रवासी मजुरांचा गोंधळ, पोलिसांवर दगडफेक; यूपी आणि हरियाणामध्ये हजारो मजुर एकत्र आले

अहमदाबाद/गाजियाबाद/सोनीपतएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादमध्ये दगडफेकीनंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले - Divya Marathi
अहमदाबादमध्ये दगडफेकीनंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले
  • अहमदाबादमधून पायी जाणाऱ्या मजुरांना अडवल्यामुळे पोलिसांच्या गाड्या फोडल्या

लॉकडाउनमुळे जगभरातील विविध भागात अडकलेल्या प्रवासी मजुरांचा राग अनावर होत आहे. सोमवारी अशाच घटना तीन राज्यात घडल्या आहेत. गुजरातमध्ये सलग पाचव्या दिवशी प्रवासी मजुरांचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. अहमदाबादमध्ये शेकडोंच्या संख्येने पायी जाणाऱ्या मजुरांना पोलिसांनी रोखल्यामुळे मजुरांना राग अनावर झाला. यादरम्यान मजुरांनी पोलिसांवर दगडफेक करत त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तिकडे, उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये हजारोंच्या संख्येने मजुर श्रमिक स्पेशल ट्रेन्सच्या रजिस्ट्रेशनसाठी एकत्र आले. तिसऱ्या घटनेत हरियाणातील सोनीपतमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त मजुर बस पकडण्यासाठी बस स्टँडवर एकत्र जमले.

उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये ट्रेनच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेकडो मजुर रामलीला मैदानात एकत्र आले
उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये ट्रेनच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेकडो मजुर रामलीला मैदानात एकत्र आले

यूपीच्या अनेक जिल्ह्यांसाठी चालवल्या जातील स्पेशल ट्रेन

गाजियाबादच्या रामलीला मैदानात मजुरांसाठी यूपी सरकारने स्पेशल कँप लावले आहेत. येथे श्रमिक स्पेशल ट्रेन्ससाठी मजुरांचे रजिस्ट्रेशन केले जात आहे. यूपी सरकार या मजुरांना राज्यातील विविध जिल्ह्यात पोहचवण्यासाठी ट्रेन चालवल्या जातील.

हरियाणामधून फॅक्टरी सोडून जात आहेत मजुर

हरियाणाच्या सोनीपतमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त मजुर एकत्र आले. हे सर्व कुंडली इंडस्ट्रियल एरियामधील फॅक्टरीत काम करत होते. एका मजुराने म्हटले, ''आम्ही यूपी आणि बिहारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलो आहोत. कंपनी लॉकडाउनमुळे बंद झाली. 55 दिवस आम्ही कसेबसे काढले. आता पैसे वाचले नाहीत. भुकेने मरण्यापेक्षा आम्ही घरी जाणे पसंत करू.'' 

हरियाणातील सोनपतमध्ये बस स्टँडवर मजुर एकत्र आले
हरियाणातील सोनपतमध्ये बस स्टँडवर मजुर एकत्र आले

सूरत आणि राजकोटमध्येही गोंधळ झाला आहे

गुजरातमध्ये यापूर्वी चार वेळेस गोंधळ झाला आहे. दोन वेळेस सूरतमध्ये प्रवासी मजुरांनी तोड-फोड केली.  राजकोटमध्ये रविवारी शापर इंडस्ट्रियल एरियात मजुरांनी वाहनांची तोडफोड केली. बिहार आणि उत्तर प्रदेश जाणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेन्स रद्द झाल्यामुळे हा गोंधळ झाला.

बातम्या आणखी आहेत...