आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Covid Hospital Fire News Inside Story | Fire On Woman's Hair Lying On ICU Bed, Then In Attendant PPE Kit And Then In Oxygen Cylinder

गुजरात घटनेची इनसाइड स्टोरी:आयसीयूत शॉर्ट सर्किटमुळे महिलेच्या केसांनी घेतला पेट, आग विझवण्याच्या प्रयत्नात 3 कर्मचारी भाजले; ऑक्सिजन सिलेंडरमुळे आग पसरली आणि सर्व खाक झाले

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदाबादच्या कोविड रुग्णालयात पहाटे 3.30 वाजती लागली होती आग, 8 रुग्णांचा मृत्यू

अहमदाबादमधील नवरंगपुरा भागातील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत 8 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे 3.30 वाजता आयसीयूच्या बेड क्रमांक 8 जवळ शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि बेडवरील झोपलेल्या महिलेच्या केसांपर्यंत पोहोचली. महिलेला वाचवण्यासाठी एक परिचर जवळ आला तर त्याच्या पीपीई किटमध्ये आग लागली. यानंतर आग विझवण्यासाठी दोन कर्मचारी पुढे आले तर ते देखील जखमी झाले. घटनेवेळी आयसीयूत 8 रुग्ण होते. या सर्वांचा मृत्यू झाला.

संपूर्ण आयसीयू जळून खाक झाले

आयसीयूत आग लागल्यामुळे गोंधळ झाला. या दरम्यान एक ऑक्सिजन सिलेंडर पडला आणि त्याने पेट घेतला. यामुळे रुग्णांना बाहेर पडता आले नाही आणि संपूर्ण आयसीयू जळून खाक झाले.

अग्निशमन दलाची टीम 15 मिनिटांत पोहोचली होती

अहमदाबाद अग्निशमन दलाचे अतिरिक्त मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश भट्ट यांनी सांगतिले की, आम्ही घटनास्थळी पोहचेपर्यंत संपूर्ण आयसीयू जळाले होते. आगीचे पसरण्याचे कारण ऑक्सिजन सिलिंडर होते. दुसरीकडे हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर 40 रुग्ण होते, तिथपर्यंत धूर होता. त्यामुळे काहीच दिसत नव्हते. येथे देखील अनेक रुग्णांना ऑक्सिजन लावला होता. यामुळे धोका वाढत चालला होता. या सर्वांच्या दरम्यान ब्रिगेडच्या 40 सैनिकांची टीम दाखल झाली आणि त्यांनी एक-एक करुन सर्व रुग्णांना बाहेर काढले.

बातम्या आणखी आहेत...