आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमध्ये वडोदरामधील सयाजीगंजमधील आम आदमी पक्षाचे उमेदवार स्वेजल व्यास हे अनामत रक्कम भरण्यासाठी समर्थकांकडून वर्गणी गोळा करत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या आवाहनावर अवघ्या दोन तासांत 9 हजार रुपये जमा झाले आहेत. दोन समर्थक तर असे होते ज्यांनी 11 हजार आणि 51 हजार रुपये पाठवले.
त्यातून स्वेजल यांनी केवळ एक रुपया स्वीकारला आणि उर्वरित रक्कम दोघांना ऑनलाइन परत केली. ते म्हणाले- मी जनतेच्या मदतीने जमा केलेल्या रकमेतूनच सुरक्षा ठेव भरेन. यासाठी त्यांचे समर्थकही पेटी घेऊन सोसायटीत फिरत आहेत, जेणेकरून लोकांच्या सहकार्याने स्वेजल व्यास यांना नामांकनासह अनामत रक्कम भरता येईल.
AAP ने 158 जागांवर उमेदवार जाहीर केले
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) आतापर्यंत उमेदवारांच्या 12 याद्या जाहीर केल्या आहेत. आपने 182 पैकी 158 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. आम आदमी पक्षाने अंजारमधून अर्जन रबारी, चानसामामधून विष्णूभाई पटेल, लिंबडीतून मयूर साकारिया, फतेपुरामधून गोविंद परमार, सयाजीगंजमधून स्वेजल व्यास आणि झगडियामधून ऊर्मिला भगत यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने सयाजीगंजमधून महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमी रावत यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 8 डिसेंबरला निकाल लागणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.