आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात विधानसभा निवडणूक:भाजपची 6 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, भावनगर पूर्वच्या आमदाराचे तिकीट कापले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गत 9 तारखेला भाजपच्या निवड समितीची बैठक झाली होती. त्यात उमेदवारांचे नाव अंतिम करण्यात आले होते.  - Divya Marathi
गत 9 तारखेला भाजपच्या निवड समितीची बैठक झाली होती. त्यात उमेदवारांचे नाव अंतिम करण्यात आले होते. 

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी आपल्या 6 उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. यात धोराजीतून महेंद्रभाई पाडलिया, भावनगर पूर्वमधून सेजल पांड्या, खंभालियातून मुलूभाई बेरा, कुतियानातून ढेलीबेन ओडेदरा, डेडियापारातून हितेश वसावा व चोर्यासीतून संदीप देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने आतापर्यंत एकूण 166 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

भावनगर पूर्वच्या आमदाराचे तिकीट कापले

भाजपने भावनगर पूर्व मतदार संघातील विद्यमान आमदार विभावरी दवे यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी सेजल पांड्या यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पहिल्या यादीत तब्बल 38 आमदारांना तिकीट नाकारले होते.

पहिल्या यादीत 5 मंत्र्यांना मिळाले नव्हते स्थान

भाजपने 10 नोव्हेंबर रोजी 182 विधानसभा मतदार संघांपैकी 160 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोढिया येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरील. येथे त्यांना काँग्रेसच्या उमेदवार एमी याज्ञिक आव्हान देतील. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या जागी डॉक्टर दर्शिता सिंह राजकोट पश्चिम येथून निवडणूक लढवली.

दुसरीकडे, भाजपने विद्यमान सरकारमधील 5 मंत्र्यांचेही तिकीट कापले आहे. यात राजेंद्र त्रिवेदी व प्रदीप परमार सारख्या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. पक्षाने कामगिरीच्या आधारावर या सर्वांना तिकीट नाकारले आहे.

काँग्रेसमधून येणाऱ्या नेत्यांना उमेदवारी

प्रद्युम्न सिंह जडेजा (अबडासा), कुवरजी बावरिया (जसदन), जवाहर चावडा (मानावदर), हर्षद रिबडीया (विसावदर), भगा बारड ( तालाला), अश्विन कोटवाल (खेडब्रह्मा), जीतू चौधरी (कपराडा) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. हे सर्व नेते 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. आता ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...