आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये BJPने 84 आमदारांचे तिकीट कापले:​​​​​​​मोरबी दुर्घटनेत पाण्यात उडी घेऊन पीडितांना वाचवणाऱ्याला दिली उमेदवारी

अहमदाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने गुरुवारी पहिली यादी जारी केली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोढियातून निवडणुकीच्या मैदानात उतरतील. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या जागी डॉक्टर दर्शिता शाह यांना तिकीट देण्यात आले आहे.

भाजपने मोरबीचे विद्यमान आमदार बृजेश यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी माजी आमदार कांतीलाल अमृतीया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोरबी पुल दुर्घटनेवेळी कांतीलाल यांनी पीडितांना वाचवण्यासाठी स्वतः नदीत उडी मारली होती. त्यांनी बचाव मोहिमेचा एक व्हिडिओही पोस्ट केला होता. रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबा यांना जामनगर उत्तरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी उमेदवारी वाटपाच्या मुद्यावर बैठक झाली होती. जवळपास 3 तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा, राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. या बैठकीत गुजरातच्या 182 जागांवरील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली.

भाजपची प्लॅनिंग -तरुणांना मिळावी संधी

भाजपचे मिशन -2022: यासाठी भाजपने 75 वर्षांवरील उमेदवारांना संधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सत्ताविरोधी लाट शमविण्यासाठी 40 नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचाही विचार सुरू केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत 2017 मध्ये विजय मिळवून देणाऱ्या 99 आमदारांपैकी 20 टक्के आमदारांना यंदा ड्रॉप करण्याचा निर्णय घेतला आहे.

यांचे तिकीट कापले जाणार : विजय रूपाणी, नितीन पटेल, भूपेंद्र सिंह चूडासमा, प्रदीप सिंह जाडेजा, आरसी फलदू, कौशिक पटेल, सौरभ पटेल, ईश्वरसिंह पटेल, जयद्रथसिंह परमार, बचू खाबड, वासण आहिर, विभावरी दवे, किशोर कानाणी व रमण पाटकर.

बैठकीपूर्वी दिग्गजांची माघार

दिल्लीत होणाऱ्या बैठकीपूर्वी गुजरातचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह 5 ज्येष्ठ मंत्र्यांनी यंदा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. या नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली. सुरुवात उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी गृहराज्यमंत्री प्रदीप सिंह जडेजा, माजी विधी व शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चूडासमा यांच्यासह सौरभ पटेल, आर सी फलदू यांनीही यासंबंधीचे पत्र पाठवले.

दिल्लीत बुधवारी भाजपच्या CECची बैठक झाली. ती रात्री 11.30 पर्यंच चालली.
दिल्लीत बुधवारी भाजपच्या CECची बैठक झाली. ती रात्री 11.30 पर्यंच चालली.
बातम्या आणखी आहेत...