आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAPचे CM पदाचे दावेदार इसुदान गढवींचा पराभव:गुजरात निवडणूक : भाजप उमेदवार मुलूभाई बेरा यांनी हरवले

अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा दारूण पराभव झाला आहे. ते खंभालिया विधानसभा मतदार संघात नशीब अजमावत होते. परंतू आपचा गुजरात निवडणुकीत पराभव झालेला आहे. तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले इसुदन गढवी यांचा देखील पराभव झाला. त्यामुळे सीएम उमेदवारालाच आपली सीट वाचवता आली नाही.

द्वारका जिल्ह्यातील खंभलिया मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आहे. या जागेवर भाजपचे मुलुभाई बेरा हे विजयी झाले. त्यांनी इसुदान गढवी यांचा पराभव केला आहे. काँग्रेसने विक्रमभाई मॅडम यांना उमेदवारी दिली होती.

गढवी हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत आणि 'आप'ने आपला मुख्यमंत्री चेहरा ठरवण्यासाठी घेतलेल्या निवडणुकीत त्यांना सुमारे 73% मते मिळाली. गढवी हे ओबीसी समाजातून येतात. ज्या जागेवर ते निवडणूक लढवत होते. ती जागा सद्या काँग्रेसकडे होती, मात्र आता ती भाजपच्या खात्यात गेली आहे. गढवी हे भाजपचे मुलुभाई बेरा आणि काँग्रेसचे विक्रम अर्जनभाई मॅडम यांच्या विरोधात होते.

कोण आहेत इसुदान गढवी?

10 जानेवारी 1982 रोजी गुजरातमधील पिपलिया येथे जन्मलेले इसुदान गढवी हे व्यवसायाने पत्रकारही आहेत. इसुदान गढवी यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत 14 जून 2021 रोजी पक्षात प्रवेश केला. गुजरातमधील 'आप'चे तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांनी गतवर्षीच आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.

इसुदान गढवी हे सद्या आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुजरातमधील 16 लाख 48 हजार 500 लोकांनी आपले मत दिले आहे. गुजरातमधील 16 लाखांहून अधिक लोकांच्या मताच्या आधारे त्यांनी निर्णय घेतला आहे. येथील जनतेने इशुदान गढवी यांची निवड केली आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तेच असतील. गुजरात बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. 'आप' हे नवे इंजिन, नवी आशा आहे.

150 कोटींचा घोटाळा उघड, मग प्रसिद्धी मिळाली

पिपलिया मधील लोकांना इसुदान गढवी यांची माहिती आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात दूरदर्शनपासून केली. हे सर्वांनाच माहीत आहे. 2007 ते 2011 पर्यंत ते इथेच राहिले. ईटीव्ही गुजरातीमध्ये असताना त्यांनी पोरबंदरमध्ये राहून शेतकऱ्यांच्या समस्यांवर अनेक बातम्या कव्हर केल्या आहेत.

इसुदान यांनी 2015 मध्ये डांग आणि कापरडा येथील झाडे तोडण्यात 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. यानंतर सरकारला कारवाई करणे भाग पडले. गावातील लोक या बाबत सांगतांना असे बोलतात, जणू हे सर्व त्यांचाच एक भाग आहेत. गुजरातमध्ये 'आप'च्या मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर इसुदान यांनी आपल्या आईशी संपर्क साधला. आईचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ताकद असल्याचे ते म्हणाले होते.

भाजप कार्यकर्त्यांशी दोन हात, एकदा अटकही झाली

20 डिसेंबर 2021 रोजी पोलिसांनी त्यांना ड्राय स्टेट मध्ये दारू पिण्याच्या आरोपाखाली कमलम येथून अटक केली होती. त्या नंतर एका सभेदरम्यान आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यानंतर गुजरात पोलिसांनी इसुदान यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल केला.

एफआयआरनुसार, इसुदान यांच्या रक्तात 0.0545 टक्के अल्कोहोल आढळून आले होते. दुसरीकडे, इसुदान आणि आप यांनी या रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता. सप्टेंबर 2021 मध्ये, सुरतचे प्रसिद्ध रामदेव पीर मंदिर पाडण्याच्या घटनेनंतर, गढवींनी सरकारविरोधात मोर्चा काढला होता. डिसेंबर 2021 मध्ये पेपर लीक झाल्यानंतरही इसुदान यांनी गांधीनगर येथील भाजप कार्यालयाबाहेर निदर्शने केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...