आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Election: Bhavnagar Revels In Stories, Population Rate Is Not Increasing

गुजरात निवडणूक:गुजरात निवडणूक : कथांमध्ये रमते भावनगर, लोकसंख्या दर वाढतच नाही

नवनीत गुर्जर | नॅशनल एडिटर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सौराष्ट्रातील भावनगर आणि अमरेली मतदारसंघात पटेल आंदोलनाचा प्रभाव असल्याने यंदा भाजपला नुकसान नाही

सौराष्ट्र मध्ये कच्छ वगळता एकूण ४८ जागा आहेत. याचे दोन भाग करूया. एक भावनगरकडील आणि दुसरा राजकोट, जुनागड व सोमनाथचा. आधी जाऊया भावनगरकडे. भावनगरच्या तीन दिशांना सुरेंद्रनगर, अमरेली आणि बोटाद हे जिल्हे आहेत. भावनगरसह या चार जिल्ह्यांतील एकूण १९ जागांपैकी सध्या १२ भाजपकडे आहेत. सात काँग्रेसच्या खात्यात. इथे भाजपला फायदा झाला नाही तरी नुकसानही होणार नाही. कारण पाटीदार आंदोलनामुळे गेल्या वेळी अमरेलीच्या पाच जागा काँग्रेसकडे होत्या. एका काँग्रेस आमदाराने भाजप जॉइन करत पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला होता.

आता भावनगरच्या कथा. लोकसंख्या दर कधीच न वाढणारे भावनगर हे एकमेव शहर आहे. कारण जितक्यांचा जन्म होतो त्यापेक्षा अधिक मुंबई, सुरत आणि अहमदाबादेत स्थलांतर करतात. येथील राजे कृष्णकुमार सिंह यांनी स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम आपल्या राज्याचे विलीनीकरण केले होते. याचीही एक रंजक कथा आहे. ने राज्य सरदार पटेलांना समर्पित करण्यापूर्वी ‘तुझ्या माहेरहून आलेली संपत्ती मी कशी काय देऊ?’ असे राजे राणीला म्हणाले. राणीने याचे सुंदर उत्तर दिले. म्हणाली, ‘हाथी आपी दीधो, तो पछी अम्बाडी राखवानी शुं जरूर?’ म्हणजे हत्ती दान केला तर त्याचा शृंगार ठेवण्याची काय गरज आहे? असो. नंतर बक्षीस म्हणून राजा कृष्णकुमार सिंह यांना मद्रासचे राज्यपाल बनवले. भावनगरातील घरांमध्ये आजही लोकांनी राजाचा फोटो लावलेला आहे. शांतताप्रिय लोक आहेत. व्यापार अलंग्याचा व हिऱ्यांचा. अलंगा म्हणजे जहाज तुटल्यानंतर निघणारे सामान. सर्व हिरे व्यापारी सुरतला गेले. तथापि, सर्वांचे एक-एक कारखाने अजूनही इथे आहेत. त्यात हजारो लोक (महिलाही) काम करतात.

भावनगरच्या पूर्वेकडे समुद्र आहे. इथे दोन बंदरे आहेत. एक बंद दुसरा सुरू. इथे हिंदीत बंदरगाहला बंदर म्हणतात. मी विचारले, बंदरगाहला बंदर म्हणतात तर बंदरला काय म्हणावे? उत्तर आले वांदरो. असो. भावनगरचे बंदर १२ महिने चालते. दुसरे आहे घोघा बंदर. येथून दोन फेऱ्या चालतात. एक दहेज म्हणजेच भडोचपर्यंत आणि दुसरी हजिरा म्हणजे सुरतपर्यंत. ट्रक, कारसह तुम्ही प्रवास करू शकता. घोघातून फेरीच्या माध्यमातून तुम्ही तीन तासांत सुरतला पोहोचू शकता, तर भडोच दोन तासांतच येते. तथापि, रस्त्याने येथून अनुक्रमे आठ आणि सहा तास लागतात. खर्चही जास्त. रस्त्याने सहा तासांचे असलेले घोघा-भरूच अंतर सागरी मार्गाने इतके जवळ आहे की त्यासाठी म्हटले जाते, ‘घोघामां कुतरा भसे तो भरूच मां संभलाय’ (घोघामध्ये कुत्री भुंकली तर ते भडोचमध्ये एकू येते.) घोघाजवळच समुद्रात निष्कलंक महादेव मंदिर आहे. समुद्रात भरती येते तेव्हा ते अर्धे बुडालेले असते. भरती संपताच मंदिरापर्यंतचा मार्ग खुला होतो. याची रोज वेगवेगळी वेळ असते. असे म्हणतात, पांडव आपले पाप धुण्यासाठी द्वारकेहून थेट इथेच आले होते. अजूनही इथे लोक निष्कलंक होण्याच्या उद्देशानेच मंदिरात येतात.

बातम्या आणखी आहेत...