आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Election |man Disrupted Rahul Gandhi's Speech And Asked Him To Speak In Hindi Instead Of Pausing For A Translator On Stage To Repeat The Same In Gujarati

'तुम्ही हिंदीत बोला.. आम्हा सगळ्यांना समजते':गुजराती भाषांतरानंतर 10 मिनिटांनी गर्दीतून आवाज आला – त्यांना हिंदी बोलू द्या

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील महुवा येथे निवडणूक सभा घेतली. यादरम्यान एक रंजक घटना घडली. सभेला राहुल गांधी हिंदीतून संबोधन करत होते. तर हिंदीतील भाषणाचे गुजरातीमध्ये अनुवादन काँग्रेस नेते भरतसिंह सोलंकी करत होते. याचदरम्यान गर्दीतून राहुल यांना हिंदी बोलू द्या, आम्हाला समजेल. भाषांतर करण्याची गरज नाही, असे एका व्यक्तीने ओरडून सांगितले. त्यानंतर राहुल यांनी सभेला हिंदीतून सभेला संबोधित केले.

राहुल हे गुजरात येथील काकडा गावात आदिवासींमध्ये बोलत होते. आधी राहुल बोलायचे आणि नंतर भरतसिंह सोलंकी गुजरातीमध्ये सांगायचे. यामुळे राहुल गांधींना पुन्हा पुन्हा थांबावे लागत होते. गर्दीतून आवाज आल्यानंतर राहुल यांनी भाषण थांबवलं आणि मंचावरुनच ‘तुम्हाला चालेल का?’ अशी विचारणा केली. गर्दीने होकार दिल्यानंतर राहुल गांधी यांनी हिंदीत संपूर्ण भाषण केले.

राहुल गांधींची भाजपवर टीका

आदिवासी हे देशाचे पहिले मालक असून, भाजपा हा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केली. ते म्हणाले की, भाजप आदिवासींवर अन्याय करत आहे. हा देश तुमचा आहे, जो भाजपने तुमच्याकडून घेतला आहे. भाजपवाले तुम्हाला आदिवासी नाहीतर वनवासी म्हणतात. याचा अर्थ तुम्ही जंगलात राहत आहात. तुम्ही स्थलांतरित व्हावे, तुमच्या मुलांनी शहरात शिक्षण घ्यावे आणि पुढे जावे, अस त्यांना वाटत नाही. तुम्ही जंगलातच राहावे, असे भाजपचे मत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

राजकोटच्या जाहीर सभेत मोरबी पूल दुर्घटनेवर 2 मिनिटांचे मौन

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राजकोटमध्ये सोमवारी राहुल गांधी पोहोचले. येथील शास्त्री मैदानावर जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी मोरबी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे मौन पाळले. मोरबीच्या घटनेचा उल्लेख करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, मोरबी दुर्घटनेत 150 लोकांचा मृत्यू झाला. हा राजकीय मुद्दा नाही. ज्यांनी हे काम केले त्यांच्यावर कारवाई झाली नाही. या अपघाताबाबत कोणताही एफआयआर नाही. दोषींचे भाजपसोबत चांगले संबंध आहेत. पुढे राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसल्याने मी निराश आहे. भारत जोडो यात्रेला जनतेकडून भरभरून प्रेम मिळत असल्याचे ते म्हणाले.

1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान

राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही टप्प्यातील मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची राजपत्र अधिसूचना 5 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी 10 नोव्हेंबरला जारी करण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी 15 नोव्हेंबरला छाननी होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 18 नोव्हेंबर आहे. पहिल्या टप्प्यासाठी 17 नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 21 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...