आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वातील सरकारच्या 20 पैकी 19 मंत्र्यांचा विजय झाला आहे. मंत्रीमंडळातील बहुतांश मंत्री जिंकण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. मतमोजणीच्या प्रारंभी जीतू वघाणी, जीतूभाई चौधरी व देवाभाई मालम पिछाडीवर पडले होते. पण मतमोजणी पुढे सरकली तशी सर्वच मंत्री विजयाच्या दिशेने अग्रेसर झाले.
गुजरातमध्ये गतवर्षी ऑगस्टमध्ये भूपेंद्र अचानक बनले मुख्यमंत्री
विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर भाजपत मोठी खळबळ माजली. राज्यातील नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर जोरदार खल झाला. कमलम नामक भाजप प्रदेश मुख्यालयात बैठकांचे सत्र सुरू होते. मुख्यमंत्री म्हणून कुणाचे नाव घोषित होणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष्य लागले होते. यासाठी नरेंद्र सिंह तोमर व तरुण चुघ पक्ष निरीक्षक म्हणून गुजरातला आले होते.
सर्वच आमदारांना कमलमला बोलावण्यात आले. विजय रुपाणी, भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटीलही उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या नव्या चेहऱ्यावर विचारविनिमय झाला. भूपेंद्र पटेल कमलममध्ये सर्वात मागे बसले होते. त्यांना आपल्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा होण्याची कोणतीही कल्पना नव्हती. सकाळी ते भोपाळमधील एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला गेले होते. ते अचानक सायंकाळी मुख्यमंत्री झाले. तेव्हा विजय रुपाणी यांच्या घरी सर्वच मंत्र्यांना ठेवण्यात आले होते. भूपेदं्र पटेल यांच्या मंत्रीमंडळात नव्या आमदारांना स्थान देण्यात आले.
अनेक मंत्र्यांची वादग्रस्त विधाने
भूपेंद्र पटेल मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी विविध वादग्रस्त विधाने केली. राजेंद्र त्रिवेदी व पूर्णेश मोदी यात आघाडीवर होते. त्यामुळे त्यांची खाती काढून घेण्यात आली. उर्वरित मंत्र्यांच्या विधानांचा मतदारांवर कोणताही परिणाम पडला नाही. विधानसभा निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
5 मंत्र्यांना उमेदवारी नाकारली
गुजरातच्या भाजप सरकारमध्ये भूपेंद्र पटेलांसह 25 मंत्री होते. त्यापैकी राजेंद्र त्रिवेदी, अरविंद रैयानी, प्रदीप परमार, बृजेश मेरजा व सूरतच्या महुवा मतदार संघाचे आमदार व राघव मकवाना 5 मंत्र्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. 2022 च्या निवडणुकीत उर्वरित 20 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिक मताधिक्याने विजय
विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये कुंवरजी बावलिया, जवाहर चावडा व धर्मेंद्रसिंह जडेजा (हकुभा) आयात मंत्री होते. तर भूपेंद्र पटेल मंत्रीमंडळात बृजेश मेरजा व जीतूभाई चौधरी आयात मंत्री होते. हे दोघेही 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. पण नंतर भाजपत सहभागी झाले. 2020 च्या पोटनिवडणुकीत मोरबीतून बृजेश मेरजा व वलसाडच्या कपरदातून जीतूभाई चौधरी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विधानसभेवर पोहोचले. त्यानंतर दोघांचीही भूपेंद्र पटेल सरकारमध्ये मंत्रीपदी निवड झाली.
या निवडणुकीत भूपेंद्र पटेल स्वतः 1 लाख 92 हजारांहून अधिकच्या मताधिक्याने विजयी झालेत. तर जीतूभाई चौधरी महत्प्रयासाने 170 मतांनी विजयी झाले. म्हणजे त्यांचा सर्वात कमी मताधिक्याने विजय झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.