आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat | Fire Breaks Out In Ahmedabad Hospital, Many Patients Died News And Updates

गुजरात:अहमदाबादच्या कोविड रुग्णालयात अग्नितांडव, 8 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू; 41 रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट केले, हॉस्पिटल सील

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदाबादच्या श्रेय कोविड रुग्णालयात गुरुवारी पहाटे 3.30 वाजता आग लागली
  • यामध्ये कोविड रुग्णांसाठी 50 बेड आहेत, घटनेवेळी 40 ते 45 रुग्ण दाखल होते

अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील एका कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत 8 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. यानंतर 30 पेक्षा अधिक रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनुसार, 'पहाडे 3.30 सुमारास श्रेय रुग्णालयाच्या आयसीयूतून या आगीला सुरुवात झाली. यानंतर ती दुसऱ्या वॉर्डात पसरली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगतिले जात आहे. अद्याप याची पुष्टी झाली नाही. यामध्ये कोविड रुग्णांसाठी 50 बेड आहेत. घटनेवेळी 40 ते 45 रुग्ण भर्ती होते.'

मोदींनी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याशी चर्चा केली

मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान केअर फंडमधून प्रत्येकी 2-2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री रूपाणी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या तपासणीचे नेतृत्व अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) संगीता सिंह करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांत रिपोर्ट मागवला आहे.

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना बाहेर काढले

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात शिफ्ट केले. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मृतांचे कुटुंबियांचे म्हणणे आहे की, रुग्णालय प्रशासनाने आगीची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला उशिरा दिली.

या लोकांचा झाला मृत्यू

वारिस मंसूरी (42), नवनीत शाह (18), लीलाबेन शाह (72), नरेंद्र शाह (51), अरविंद भावसार (72), ज्योती सिंघी (55), मनुभाई रामी (82) आणि भाविन शाह (51)

बातम्या आणखी आहेत...