आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमळम:भाजप शासित राज्यात चक्क फळाचे नाव बदलले; कमळासारखे दिसत असल्याने 'ड्रॅगन' फ्रूटला दिले 'कमलम' असे नाव

अहमदाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशेष म्हणजे गुजरात भाजप कार्यालयाचे सुद्धा 'कमलम' हेच नाव

गुजरात सरकारने आता ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून कमलम ठेवले आहे. स्वतः मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ही घोषणा केली आहे.भाजप शासित राज्यामध्ये चक्क फळाचे नाव बदलून कमलम असे ठेवण्यात आले आहे. गुजरातच्या भाजप कार्यालयाला कमलम असे नाव आहे.

भाजप कार्यालयांचे नाव कमलम आहे
ड्रॅगन फळाचे नाव कमलम आहे. चीनी ड्रॅगन फळाला आता गुजरातमध्ये कमलम म्हटले जाणार आहे. कारण हे फळ कमळाप्रमाणे दिसते आणि भाजप कार्यालयाचे नावही कमलम आहे. यामुळे गुजरात सरकारने याचे नाव कमलम ठेवले आहे. याला मंजूर करण्यात आले आहे. ड्रॅगन फ्रूटच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लाल आणि गुलाबी फळ दिर्घकाळापासून गुजरातच्या बाजारात येतात. कच्छमध्ये याचे उत्पादन केले जाते आणि याचे नाव ड्रॅगन फ्रूट ठेवण्यात आले आहे. मात्र आता याचे नाव कमलम असे ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आज म्हटले की, त्यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून कमलम ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ज्याला मंजूरी मिळाली आहे. यामुळे आता गुजरातमध्ये ड्रॅगन फ्रूटला कमलम नावाने ओळखले जाईल.

या नावाची पेटेंट प्रक्रिया सुरू

रुपानी यांनी म्हटले की, ड्रॅगन फ्रूटचे काही नाव नाही. हे फळ चीनमधील मूळ निवासी नाही. पण अनेक वर्षांपासून ते तिथे आहेत. कॅक्टससारख्या झाडांवर उगवणाऱ्या या फळांचा वापर च्युइंग गम आणि इतर जडी-बूटींमध्येही केला जातो. यामुळे आम्ही याला नवीन संस्कृत नाव कमलम दिले आहे. या नावाची पेटेंट प्रक्रिया सुरू आहे. एवढेच नाही तर जेव्हा पेटेंट प्रदान केले जाते, तेव्हा आम्ही पहिलेच याला कमलमच्या रुपात संदर्भित करणे सुरू करतो.

कमलम हे नाव का दिले?
गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, 'ड्रॅगन' या फळाचा आकार कमळासारखा आहे. याच कारणामुळे याचे नाव बदलून 'कमलम' करण्यात आले आहे. संस्कृत भाषेमध्ये कमळाला कमलम असे म्हटले जाते. नुकतेच हे फळ भारतात लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी बाजारात हे फळ सहजरित्या उपलब्धही होत आहेत. उष्णकटीबंधातील हे फळ आपल्या वेगळ्या चवीसाठी ओळखले जाते.

...नाव बदल्याने अजून एक कारण
या फळाचे नाव बदल्यामागेही कारण आहे. याविषयी बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, फळाचे नाव चीनशी निगडीत होते. यामुळे आम्ही या फळाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...