आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat GUJSAIL Ceo Captain Ajay Chauhan Update News; Aircraft Trips Case | Ajay Chauhan

18 वर्षांत कमावली 100 कोटींची प्रॉपर्टी:GUJSAIL च्या माजी CEO विरोधात चौकशी सुरू; सरकारी विमानातून 100 खासगी प्रवासांमुळे निलंबित

लेखक: भाविन पटेल, अहमदाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (GUJSAIL) चे माजी CEO कॅप्टन अजय चौहान यांना काही दिवसांपूर्वी सरकारी विमानातून 100 हून अधिक वैयक्तिक प्रवास केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले होते. आता अलीकडेच त्यांची 100 कोटींची अवैध संपत्ती उघड झाली आहे. त्यांच्या या मालमत्ता देश-विदेशात आहेत. त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सरकारने कारवाई केली असून चौकशी सुरू आहे.

कुठे-कुठे आहेत अजय यांच्या मालमत्ता?

या प्रकरणात दिव्य मराठीचे सहयोगी दिव्य भास्करकडे तारीख, ठिकाणासह 26 प्रवासांचे पुरावे आहेत. तसेच मालमत्तेचेही पुरावे आहेत. अजय यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आहे. अहमदाबादच्या प्रल्हादनगरमधील रिव्हिएरा एलिगन्समधील दोन फ्लॅट, कराई गांधीनगर आणि शेला येथील दोन मोठे फार्म हाऊस, एसजी हायवे आणि कॉमर्स सिक्स रोडवरील प्राइम लोकेशन्सवरील व्यावसायिक मालमत्ता, नोएडामधील फ्लॅटसह देशात अशी सुमारे 66 कोटींची मालमत्ता आहे.

अजय चौहान यांचे अहमदाबाद, गांधीनगर येथे 66 कोटींचे फ्लॅट, बंगले आणि दुकाने आहेत, हा फोटो रिव्हिएरा एलिगन्स प्रल्हादनगरचा आहे, येथे त्यांचे 6 कोटींचे दोन फ्लॅट आहेत.
अजय चौहान यांचे अहमदाबाद, गांधीनगर येथे 66 कोटींचे फ्लॅट, बंगले आणि दुकाने आहेत, हा फोटो रिव्हिएरा एलिगन्स प्रल्हादनगरचा आहे, येथे त्यांचे 6 कोटींचे दोन फ्लॅट आहेत.

अजय हे पाली जिल्ह्यातील श्रीसेला गावचे रहिवासी आहेत. येथेही त्यांच्याकडे पुष्कळ जमीन आहे. या सर्व मालमत्तांचे भाडे महिन्याला सुमारे 15 लाख रुपये आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेचे ग्रीन कार्डधारक कॅप्टन अजय हे NRI अकाउंट होल्डरही आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावावरही येथे अनेक मालमत्ता आहेत.

दुसरीकडे, अजय चौहान यांच्या मालकीच्या गांधीनगर फार्म हाऊसमधील GUJSAIL च्या नावाने खरेदी केलेल्या आलिशान फर्निचरसह संपूर्ण केबिन सरकारने जप्त केली आहे. जी सध्या कंपनीच्या आवारात आहे.

13 वर्षे GUJSAILचे CEO होते अजय

अजय हे 18 वर्षे गुजरातच्या नागरी विमान वाहतूक विभागात नियामक होते. याच काळात ते गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (GUJSAIL) चे 13 वर्षे CEO होते. त्यांच्याविरुद्ध विमानाचा वापर केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. ज्याची चौकशी करण्यात आली आणि आरोप सिद्ध झाले की अजय मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासाठी वापरण्यात येणारे सरकारी जेट त्यांच्या कुटुंबाच्या प्रवासासाठी वापरत होते. यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. सध्या ते लेखा व्यवस्थापक म्हणून सरकारी सेवेत आहेत, मात्र दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या जागी आता आयएएस नितीन सांगवान यांना पदभार देण्यात आला आहे.

अजय चौहान हे 13 वर्षे गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (GUJSAIL) चे CEO होते.
अजय चौहान हे 13 वर्षे गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (GUJSAIL) चे CEO होते.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय अजय यांनी प्रवास करून सरकारच्या खात्यात कोट्यवधी रुपये खर्च दाखवला. खरेतर, दोन्ही पदे भूषविलेल्या कॅप्टन अजय चौहान यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या विमानात बिघाड झाल्यानंतर एअरबस कंपनीचा अहवाल दडपला होता, ज्यामध्ये विमानाचे इंजिन बदलण्यास सांगण्यात आले होते.

अजय यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या नावावर गांधीनगरमध्ये 25 कोटी आणि अहमदाबादमध्ये 20 कोटींची मालमत्ता खरेदी केली आहे.
अजय यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या नावावर गांधीनगरमध्ये 25 कोटी आणि अहमदाबादमध्ये 20 कोटींची मालमत्ता खरेदी केली आहे.

कुटुंबातील सदस्यांच्या प्रवासाला वापरले सरकारी विमान

दिव्य भास्करकडे लोकेशनच्या पुराव्यांसह 26 प्रवासाच्या तारखा आहेत, अजय यांनी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी बडोदा, केवडिया, फलना आणि गांधीनगर ते पुणे असा 8 वेळा हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. अहमदाबाद ते मुंबई किंवा मुंबई ते अहमदाबाद जाण्यासाठी त्यांनी सरकारी विमानाचा अनेक वेळा वापर केला. कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक सोयीसाठी, विमानतळावरून रात्री उशिरापर्यंत अनेक उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.

यात अजय यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत, ज्यांच्यासोबत त्यांनी प्रवास केला होता.
यात अजय यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत, ज्यांच्यासोबत त्यांनी प्रवास केला होता.

देखभालीच्या नावाखाली वार्षिक 4.80 कोटी कमिशन

गुजरात सरकारच्या नवीन 650 चॅलेंजर जेट विमानाच्या देखभालीसाठी दरमहा 50 लाख रुपये खर्च येतो. याउलट, देखभाल करणाऱ्या कंपनीकडून जास्तीचे बिल काढायचे आणि 90 लाख रुपये रेकॉर्डवर टाकायचे. अशाप्रकारे सरकारची दरमहा 40 लाख रुपयांची म्हणजे एका वर्षात सुमारे 4.80 कोटी रुपयांची फसवणूक झाली.

दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची बनावट बिलेही काढली

2019 मध्ये इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान आनंद येथे ग्राउंड करण्यात आले होते. 2019 मध्येच एअरबस कंपनीने राज्याच्या नागरी विमान वाहतूक विभागाला एक अहवाल पाठवला होता की हेलिकॉप्टरच्या ब्लेडला (पंखा) तडे गेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गंजले आहे, हेलिकॉप्टरचे इंजिन लवकरात लवकर बदलणे आवश्यक आहे. एअरबस कंपनीने हा अत्यंत गंभीर इशारा दिला तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या देखभालीचे कंत्राट नोएडास्थित इंडोकॉप्टर नावाच्या कंपनीकडे होते. कंपनीच्या फायद्यासाठी कॅप्टन अजय यांनी एअरबसचा अहवाल दडपला.

घर-फार्म हाऊसमधून 3 कोटी रुपयांचे फर्निचर जप्त

कॅप्टन अजय चौहान यांच्या फ्लॅट आणि फॉर्म हाऊसमधून 3 कोटी रुपयांचे सरकारी फर्निचर जप्त करण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांच्या नावाने खरेदी केलेले हे फर्निचर आहे. कॅप्टन अजय चौहान यांनी आपल्या पदाच्या जोरावर अहमदाबादेतील त्यांच्या आलिशान फ्लॅट आणि फार्म हाऊसवर नेले. GUJSAIL च्या निलंबनानंतर सुरू झालेल्या चौकशीचा भाग म्हणून हे फर्निचर परत घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...