आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दाेनदिवसीय बैठक २-३ जुलै रोजी हैदराबादेत होऊ घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही बैठकीत सहभागी होतील. मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभरातून मिळालेल्या प्रतिसादाच्या विश्लेषणाचा अहवाल बैठकीत मांडला जाईल. याबरोबरच गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. कार्यकारिणीच्या बैठकीबाबत सर्व राज्यांच्या शाखांना पत्र पाठवले जाईल. कार्यकारिणीचे सुमारे ३०० पदाधिकारी बैठकीत सहभागी होतील. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ३ जुलै रोजी मोदी कार्यकारिणीला मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी सायंकाळी मोदींची हैदराबादेत जाहीर सभाही होऊ शकते. पाच वर्षांनंतर कार्यकारिणीची बैठक दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आली आहे. २०१७ मध्ये आेडिशातील भुवनेश्वरमध्ये अशी बैठक झाली होती. राज्यात भाजपने गेल्या लाेकसभा निवडणुकीत चार जागा जास्त जिंकल्या होत्या. त्यामुळेच हैदराबादेत कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येते.
हैदराबादच्या स्थानिक निवडणुकीतही भाजपला चांगले यश मिळाले होते. तेव्हा गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचार केला होता. तेलंगणात भाजपला आपली शक्ती वाढवायची आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्याला धार देण्यासाठी हैदराबादमधील बैठकीला महत्त्वाचे मानले जाते. २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर काही महिन्यांतच लाेकसभेची निवडणूक होणार आहे. टीआरएसमुळे काँग्रेसला या भागात आपला पाया मजबूत करता आलेला नाही. त्यामुळेच भाजप संपूर्ण शक्ती लावून टीआरएसचा मुकाबल्याचा प्रयत्न करत आहे. बंगालमध्ये भाजपने डावे व काँग्रेसला बाजूला सारत आपली शक्ती वाढवली. त्याचप्रमाणे तेलंगणातही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.