आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Home Minister's Controversial Statement On Rape Cases, Latest News And Update

बलात्कारावर गुजरातच्या गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान:​​​​​​​संघवी म्हणाले -मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओंमुळे होतात सर्वाधिक बलात्कार, आरोपी -शेजारी किंवा नातेवाईकच असतात

अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी बलात्काराच्या मु्द्यावर वादग्रस्त विधान करुन पोलिसांची पाठराखण केली आहे. त्यांनी समाजातील वाढत्या बलात्कारांसाठी मोबाईलला जबाबदार धरले आहे. 'बलात्काराच्या घटना समाजासाठी कलंक आहेत. या घटनांसाठी मोबाईल फोन व ओळखीचे लोक जबाबदार असल्याचा खूलासा एका सर्वेक्षणातून झाला आहे. या प्रकरणांतील बहुतांश आरोपी हे ओळखीचे म्हणजे शेजारी किंवा कुटूंबातील सदस्य असतात', असे ते सूरतच्या सरसाणा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हणालेत.

नेहमीच पोलिसांना दोष देता येत नाही

म्हणाले, बलात्काराच्या घटनांसाठी प्रत्येकवेळी पोलिसांना दोष देणे चूक
म्हणाले, बलात्काराच्या घटनांसाठी प्रत्येकवेळी पोलिसांना दोष देणे चूक

संघवी म्हणाले, आपण बलात्काराच्या सर्वच घटनांसाठी पोलिसांना जबाबदार धरतो. आपण केवळ पोलिसांना दोष देऊ शकत नाही. समाजात अशा प्रकारचाी मानसिकता कशी निर्माण होते, याचा अभ्यास केला पाहिजे. हे काम केवळ पोलिसांवर सोडून चालणार नाही.

गुजरात सर्वात सुरक्षित

जर एखादा जन्मदाता आपल्या छोट्या मुलीवर बलात्कार करत असेल तर त्यामागे मोबाईल फोनचे कारण आहे. पित्याने आपल्या छोट्या मुलीवर बलात्कार करणे हा मोठा सामाजिक मुद्दा नव्हे काय?, असा सवाल संघवी यांनी या प्रकरणी उपस्थित केला. देशात गुजरात सर्वाधिक सुरक्षित राज्य असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

बातम्या आणखी आहेत...