आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतासोबतच्या सीमा वादानंतर सुरू झालेल्या चीनविरोधी लाटेने देशाच्या सिरॅमिक उद्योगांत प्राण फुंकले आहेत. गेल्या सहा महिन्यांत सिरॅमिक हब मोरबीमध्ये(गुजरात) १०० हून जास्त सिरॅमिक कारखाने सुरू झाले आहेत. दुसरीकडे, सिरॅमिक पावडरचा पुरवठा करणाऱ्या राजस्थानच्या युनिट्सचा व्यवसाय अडीच पट झाला आहे.
चीनसोबतचा व्यवसाय बंद करण्याच्या प्रयत्नाअंतर्गत गेल्या चार महिन्यांत देशात सिरॅमिक टाइल्सच्या आयातीत बरीच घट आली आहे. ही घट पूर्ण करण्यासाठी गुजरातच्या मोरबीसह अन्य औद्योगिक क्षेत्रांत १०० ते १२० नव्या सिरॅमिक टाइल युनिट्सची स्थापना झाली आहे. यामध्ये सुमारे १०,००० ते ११,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. आगामी दिवसांत आणि येथील अनेक कंपन्यांची उत्पादन क्षमता वाढवण्याची तयारी सुरू आहे. गुजरातचा सिरॅमिक उद्योग कोरोना महारोगराई येण्याआधी आपल्या एकूण उत्पादनाच्या १८% हिस्सा निर्यात करत होता. आता आपल्या एकूण उत्पादनाच्या २२-२३% हिस्सा निर्यात करत आहेत. आगामी दिवसांत यात वाढ होऊन २५-३०% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सिरॅमिक टाइल्सचे उत्पादन वाढल्याने यामध्ये वापरला जाणारा कच्चा माल सिरॅमिक पावडरच्या मागणीतही १०० पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
सिरॅमिक पावडरचे उत्पादन राजस्थानमध्ये होते. राजस्थानच्या अजमेर, राजसमंद, उदयपूर, डुंगरपूर, पाली, सिरोही, दौसा, बिकानेर, जयपूर, सीकर, भिलवाडा आणि टोंकसह जवळपास २० जिल्ह्यांत सिरॅमिक पावडरचे सुमारे ४,००० युनिट्स आहेत. एकट्या ब्यावरमध्ये ८०० युनिट्स सिरॅमिक पावडर तयार करतात. व्यावसायिकांनुसार, या वर्षी नोंव्हेंबरदरम्यान राज्याच्या सिरॅमिक युनिट्समध्ये जवळपास ७२० कोटी रुपयांच्या सिरॅमिक पावडरचा व्यवसाय केला. हा गेल्या वर्षीच्या सुमारे २८८ कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या १५० टक्के जास्त आहे.
ग्लेज्ड विट्रिफाइड टाइलचा नवा ट्रेंड
चीनकडून आयात बंद झाल्याने आणि रिअल इस्टेट क्षेत्रात आलेल्या तेजीने सिरॅमिक उद्योगाला खूप फायदा झाला. सिरॅमिक उद्योगाच्या देशातील एकूण उत्पादनात गुजरातची ९०% हिस्सेदारी आहे. २०१९ मध्ये गुजरातच्या सिरॅमिक उद्योगाची बाजारपेठ ४६,००० कोटी रु. होती. आता हा ५०,००० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. २०२१ च्या अखेरीस ही ५५,००० कोटी रुपयांहून जास्त होण्याचा अंदाज आहे. - भावेश
वरमोरा, वरमोरा ग्रुप ऑफ कंपनीज
कोविडमुळे जगात अनेक देशांनी चीनकडून सिरॅमिक टाइल्स खरेदी करणे बंद केले आहे. याचा थेट फायदा भारताच्या सिरॅमिक टाइल उद्योगावर झाला आहे. या वर्षी नोव्हेंबरदरम्यान राज्याच्या सिरॅमिक पावडर युनिट्सनी जवळपास १०० टक्के उत्पादन क्षमतेचा उपयोग केला आहे. गेल्या वर्षी जे युनिट्स बंद झाले होते, ते नव्याने सुरू करण्यात आले आहेत. - सुरेंद्र सिंह राजपुरोहित, प्रदेश संयोजक, राजस्थान मायनर मिनरल उद्योग संघ, ब्यावर
चीनविरोधी लाटेने देशात ग्लेज्ड विट्रिफाइड टाइलची(जीव्हीटी) नवी बाजारपेठ उभी राहिली आहे. फरशीच्या कामात उपयोगी ठरणारी ही स्वस्त टाइल्स चीनहून आयात केली जात होती. मात्र, आता त्याची निर्मिती देशात होत आहे. मोरबीमध्ये जीव्हीटीच्या ८२ नव्या युनिट्सची स्थापना केली आहे. जीव्हीटी नवा ट्रेंड स्वरूपात पुढे येत आहे. यामुळे सिरॅमिक टाइल उद्योगासाठी नवीन दरवाजे खुले झाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.