आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Kamnath Mahadev Mandir History; Akhand Jyot | 100 Year Old Ghee | Kamnath Mahadev Mandir

पंथ100 वर्षे जुने तूप 1200 मडक्यांत सुरक्षित:ना वितळते ना खराब होते, महादेवाची ज्योत त्यावरच जळते; महिला-ब्राह्मणेतरांवर बंदी

खेडा (गुजरात)17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळपते ऊन्ह... पारा 40 शी पार...या सूर्यप्रकाशात डोळेही नीट उघडत नव्हते. असे असतानाही गुजरातच्या राधू गावातील श्री कामनाथ महादेव मंदिरात भाविकांची सतत ये-जा सुरू आहे.

या मंदिरातील ज्योत 100 वर्षे जुन्या तुपाने जळते. मी हे ऐकले होते, माझ्या मनात थोडी शंका आली की, हे कसे शक्य आहे. या शंकेने मी मंदिराच्या आवारात प्रवेश करते. आत जाताच देशी तुपाचा सुगंध माझ्या नसनसांत भरू लागतो...

आज पंथ मालिकेत जाणून घेऊया कामनाथ मंदिर व तिथे वापरल्या जाणाऱ्या 100 वर्षे जुन्या तुपाचा इतिहास...

राधू गाव. अहमदाबादपासून 50 किमी व खेडा जिल्ह्यातील नडियादपासून 35 किमी अंतरावर आहे. त्याच्या जवळच ढोलका हायवे आहे. तिथे 629 वर्षे जुने शिवमंदिर आहे. त्याचे नाव श्री कामनाथ महादेव मंदिर.

राधू गावातील नागरिक महादेवाला 'दादा' म्हणतात. या मंदिरापर्यंत तुम्ही तुमच्या खासगी वाहनानेच पोहोचू शकता. तिथे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही.

या मंदिरात जाण्यासाठी मी अहमदाबादहून टॅक्सी पकडली. लोकांकडून याविषयी एवढे ऐकले होते की, हे एखादे मोठे मंदिर असेल मला वाटले. पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. मला कोणतीही भव्यता दिसली नाही.

बाहेरच्या भिंतींवर काळ्या रंगाची भांडी आहेत. मंदिराच्या बाहेरील दरवाजावर शिव व पार्वतीचे चित्र टाइल कलेत कोरलेले आहे. 2 मोठे दरवाजे आहेत, जे सोनेरी रंगाचे आहेत.

लांब कॉरिडॉर ओलांडल्यानंतर मंदिर येते. मंदिर गोलाकार आहे. त्याच्या गेटच्या दोन्ही बाजूला 2 सुंदर हत्ती आहेत.
लांब कॉरिडॉर ओलांडल्यानंतर मंदिर येते. मंदिर गोलाकार आहे. त्याच्या गेटच्या दोन्ही बाजूला 2 सुंदर हत्ती आहेत.

मंदिराच्या गर्भगृहात महिला, ब्राह्मणेतर पुरुष व लहान मुलांना प्रवेश नाही. याविषयी शास्त्री चिराग पुरोहित सांगतात की, सर्वसामान्यच नव्हे तर प्रत्यक्ष पंतप्रधान आले तरी त्यांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याची परवानगी नाही.

पुजार्‍याचे बोलणे ऐकून मन थोडे उदास झाले. गर्भगृहात न जाता मला आतील दृश्याची अनुभूती कशी घेता येणार, मी हे सर्व तुमच्यापर्यंत कसे पोहोचवणार, असे विविध प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले.

माझ्या विनंतीनंतर मला अशा ठिकाणी उभे राहण्याची परवानगी देण्यात आली जेथून मला गर्भगृह स्पष्टपणे दिसत होते.

आणि हो… तुम्हाला सर्व सांगायला विसरले… गर्भगृह 3 पायऱ्या खाली व जमिनीच्या आत आहे. पायऱ्यांच्या आधी 2 छोटे दरवाजे आहेत. ज्याभोवती आरशावर व आणि पार्वतीचे चित्र बनवण्यात आले आहे.

गर्भगृहात फुलांनी सजवलेले शिवलिंग आहे. त्याच्या जवळच शुद्ध सोन्याने बनवलेले शिवाचे मुख आहे. येथे पार्वतीचीही मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला 600 वर्षे जुनी अखंड ज्योत जळत आहे.
गर्भगृहात फुलांनी सजवलेले शिवलिंग आहे. त्याच्या जवळच शुद्ध सोन्याने बनवलेले शिवाचे मुख आहे. येथे पार्वतीचीही मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला 600 वर्षे जुनी अखंड ज्योत जळत आहे.

गर्भगृहात वीज नाही, तरीही गर्भगृहातील शिवलिंग पाहता येते. गर्भगृहात 2 दिवे जळत आहेत. मंदिर बांधल्यापासून उजव्या बाजूचा दिवा अखंड असाच जळत आहे. ही अखंड ज्योत पाहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. माझीही नजर त्याच्यावरच आहे. मी जे ऐकले ते खरे आहे की नाही हे कदाचित मला तपासायचे होते...

या मंदिरात दूरदूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. नवस पूर्ण झाल्यावर ते परत येतात व तूप अर्पण करतात. ईश्वर सिंह राजस्थानातून 'दादा'च्या दर्शनासाठी आलेत. त्यांनी 'दादा' कडे जे मागितले ते मिळाले. त्यामुळे आता देशी तूप घेऊन ते परत आलेत.

नवसाचे हे तूप आवारात बनवलेल्या तुपाच्या भांडारात ठेवलेल्या भांड्यांमध्ये पोहोचवले जाते. नंतर ते अखंड ज्योत पेटवण्यासाठी वापरले जाते.

महाशिवरात्री व श्रावण महिन्यात येथून नगर पालखी निघते. गावात यात्रा रते. येथे मध्य प्रदेश व महाराष्ट्रासह परदेशातूनही भाविक येतात. गुजरातच्या या भागात मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय राहतात.

मनोजचे दुकान मंदिराबाहेर आहे. ते तूप विकतात. ते म्हणाले की, लोक 10 रुपयांपासून 50 किलोच्या पाऊचमध्ये तूप खरेदी करतात. जसा त्यांचा नवस व श्रद्धा...

या तुपाची थोडीशीही चव कुणी घेऊ शकत नाही, असे मनोज सांगतो. त्याचा वापर केवळ महादेवाचे दिवे लावण्यासाठी होतो. अनेक वर्षांपूर्वी येथे प्रथा होती की, ज्याच्या घरी गाय किंवा म्हशीचे वासरू जन्मले ते सर्वात अगोदर दुधापासून बनवलेले तूप मंदिरात आणायचे.

काळ बदलला तसे लोकांचे रोजगारही बदलले. आता गावात फार कमी लोक गाई-म्हशी पाळतात. त्यामुळे भाविक मंदिराबाहेरील बाजारातून तूप विकत घेऊन अर्पण करतात. काही लोक घरून तूपही आणतात. आता गावात तूप खरेदीसाठी डेअरी सुरू केली जात आहे.

मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन ट्रस्टकडून केले जाते. गुजरात सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या या मंदिराचे मुख्य विश्वस्त अजित सिंग गुरबा सिसोदिया सांगतात की, सध्या जवळपास 80,000 किलो तूप आहे. त्यातील सर्वात जुने तूप 100 वर्षे जुने आहे.

तुपाच्या प्रमाणानुसार गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून दर 2 आठवड्यांनी भांडी येतात. 1 मडके बनवण्यासाठी 350 रुपये लागतात. भांडे सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या तळाशी गोलाकार बनवला जातो. त्यावर भांडे ठेवले जाते.

ही सर्व भांडी गडद काळ्या रंगाची आहेत. प्राचीन काळापासून या भांड्यांचा वापर तूप साठवण्यासाठी केला जातो. ही परंपरा आजही कायम आहे. मटके बाहेरून काळे रंगवलेले दिसतात, प्रत्यक्षात तसे नाही. ती फक्त माती आहे.

महादेव दादाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक गरम मार्बलवर सरळ चालत तूपाच्या भंडाराकडे धाव घेत आहेत. त्यांची उत्सुकता फक्त या तुपाची साठवणूक पाहण्याची असते. का असू नये, कारण एकतर त्यांचा नवस पूर्ण झाला आहे किंवा ते नवस मागायला आलेत.

मी ही त्या दिशेने चालायला लागले. मी येथे येण्यापूर्वी जे काही ऐकले व वाचले होते, ते खोटे वाटत होते. 100 वर्षे जुने तूप सुरक्षित कसे असू शकते याची मला खात्री नव्हती. त्याचा वास नसावा किंवा ते खराब झाले असावे, असे वाटत होते.

तूप ठेवण्याच्या खोलीची जमीन एवढी स्वच्छ आहे की, कोणताही खाद्यपदार्थ खाली पडला तर उचलून खाऊ शकतो. मला तिथे एकही माशी, डास किंवा कीटक दिसला नाही. एवढी स्वच्छता व देशी तुपाचा असा सुगंध की, तुम्ही स्वतः त्यात कैद व्हाल.

तूप ठेवण्यासाठी आवारात अशा 4 खोल्या आहेत. तिथे सुमारे 1200 भांड्यांमध्ये 80 हजार किलो तूप ठेवले जाते. पहिल्या खोलीत ठेवलेल्या भांड्यांमध्ये सर्वात जुने तूप आहे. तर चौथ्या खोलीतील तूप ताजे आहे.

तूप चांगले ठेवण्यासाठी गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात मातीपासून भांडी बनवली जातात. तेथून मंदिरात आणण्यासाठी वार्षिक 73 हजार रुपये खर्च येतो. भांडी बनवण्याचा खर्च वेगळा आहे.
तूप चांगले ठेवण्यासाठी गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात मातीपासून भांडी बनवली जातात. तेथून मंदिरात आणण्यासाठी वार्षिक 73 हजार रुपये खर्च येतो. भांडी बनवण्याचा खर्च वेगळा आहे.

मी आधी तूप साठवणुकीच्या खोली क्रमांक 1मध्ये गेले. एका मडक्याचे ताट काढले, दुसरे काढले, तिसरे काढले. या उन्हातही तूप पूर्णपणे गोठले आहे. काही भांड्यांमध्ये तूप पूर्णपणे पांढरे असते, तर काहींमध्ये ते पिवळे असते.

या मॅटवर साचलेली धूळ अनेक वर्षांपासून येथे पडून असल्याचे दिसून येत आहे. काही हंडे अस्वच्छ झालेत. यामुळे त्यांचा मूळ काळा रंग हरवला आहे. पहिल्या खोलीत शिवाचा धुना व मूर्ती आहे. काही भांडी लाकडी रॅकवर ठेवली जातात तर काही जमिनीवर. दुसर्‍या व तिसर्‍या खोल्यांमध्येही हेच आहे.

चौथी खोली नवीन तूप साठवण्यासाठी आहे. तिथे ठेवलेले मडक्याचे झाकण काढले, तर त्यात पातळ ताजे तूप दिसते. काही ब्रँडेड तुपाचे रिकामे डबेही ठेवले आहेत. नवीन स्टोरेजमध्ये समस्या आहे. उष्णतेमुळे तूप वितळत आहे. येथे भांड्यातून पडणारे तूप त्यात शोषले जावे व जमिनीवर पडू नये म्हणून तळाशी भुसाचा ढिगारा तयार केला आहे.

मंदिराच्या एका विश्वस्तानुसार, मंदिर व्यवस्थापनाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्याकडे तूप ठेवण्यासाठी जागा नाही. येथे अगोदरच 80 हजार किलो तूप ठेवण्यात आले असून, दररोज सुमारे 20 ते 30 किलो तूप येते. कधी- कधी यापेक्षा जास्त येते. श्रावण महिन्यात येथे पाय ठेवायला जागा नसते. 50 किलोपर्यंत तूप नैवेद्यात येते.

एवढे वर्षे लोटली पण जुने तूप अजून का खराब झाले नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक लोक येथे संशोधनासाठी आले. पण काहीही निष्पन्न झाले नाही. शास्त्री चिराग पुरोहित यांच्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्यासह अनेक आयुर्वेद संस्थांनी औषधांमध्ये वापरण्यासाठी येथील जुन्या तुपाची मागणी केली आहे. या सर्वांना तूप देण्यास मंदिर परिसराने नकार दिला. हे तूप महादेवाची अखंड ज्योत प्रज्वलित करण्याशिवाय इतर कोणत्याही कामासाठी वापरता येत नाही.

मंदिराच्या वरच्या मजल्यावर प्रसाद वाटला जातो. मी पण प्रसाद घेण्यासाठी तिथे पोहोचते. तिथे गेल्यानंतर आपण गावातील कुणाच्यातरी लग्नात जेवण्यासाठी आल्याचे वाटते. प्रसाद लावण्यात आला आहे. पुरी, डाळ, हिरव्या भाज्या, तांदूळ, पापड व बेसनाची बर्फी.

मंदिराचा सर्व प्रसाद शुद्ध देशी तुपात बनवला जातो. प्रसादासाठी तूप बाहेरून विकत आणले जाते. नवसाचे तूप स्वयंपाकासाठी वापरले जात नाही.
मंदिराचा सर्व प्रसाद शुद्ध देशी तुपात बनवला जातो. प्रसादासाठी तूप बाहेरून विकत आणले जाते. नवसाचे तूप स्वयंपाकासाठी वापरले जात नाही.

वृद्ध किंवा गुडघेदुखी असणाऱ्यांना बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था आहे. आम्हीही प्रसाद घेतला. गुजराती प्रसादात सर्वकाही गोड असले तरी मला साग अप्रतिम वाटला. गरमागरम पुर्‍या दिल्या जात आहेत. प्रत्येकाच्या प्लेट्समध्ये काही कमी आहे का, याची पुन्हा पुन्हा तपासणी केली जात आहे. येथे ज्या प्रेमाने जेवण दिले जाते व ज्या प्रकारची काळजी घेतली जाते, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.

मंदिर पहाटे 5 वाजता उघडते. रात्री 9 पर्यंत ते उघडे असते. सकाळी 5 आणि सायंकाळी 7 वा. आरती होते. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच प्रसाद मिळतो. सायंकाळी आलेले तूप गोळा करून भांड्यात टाकले जाते.

पुजारी कुटुंब 3 पिढ्यांपासून महादेव दादांच्या सेवेत आहे. सध्या शास्त्री चिराग पुरोहित 'दादांची' सेवा करत आहेत.
पुजारी कुटुंब 3 पिढ्यांपासून महादेव दादांच्या सेवेत आहे. सध्या शास्त्री चिराग पुरोहित 'दादांची' सेवा करत आहेत.

मंदिर कधी बांधले, कुणी बांधले? शास्त्री चिराग पुरोहित यांच्या माहितीनुसार, '629 वर्षांपूर्वी जेसांग भाई हिरा भाई नावाचे शिवभक्त राधू येथे राहत होते. त्यांची शिवावर अपार श्रद्धा होती. त्यावेळी राधू गावात महादेवाचे मंदिर नव्हते. ते रोज सकाळी राधू गावातून दक्षिणेकडील वात्रक नदी पार करून पुनाज गावात महादेवाच्या दर्शनासाठी जात असत. महादेवाचे दर्शन घेऊनच ते रोजचे काम सुरू करायचे. महादेवाच्या दर्शनाशिवाय अन्नाचा कण घेत नव्हते.

एके दिवशी वात्रक नदीत पाणी जास्त होते. पूर आला होता. जेसांग भाई हिरा भाई नदीच्या काठावर पोहोचले तेव्हा त्यांना पुरामुळे नदी ओलांडणे अवघड असल्याचे दिसले. कसेतरी नदीच्या पलीकडे महादेव पूजा करून ते घरी परतले.

8 दिवसांपासून नदीचे पाणी वाढतच होते. जेसंग भाई हिरा भाई यांनी 8 दिवस उपवास केला. अन्नाचा 1 दाणाही घेतला नाही. 8 व्या दिवशी त्यांची तपश्चर्या पाहून महादेव त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांनी माझी ज्योत पुंज गावातून आणून राधू गावात स्थापित करण्यास सांगितले.

सकाळी त्यांनी या स्वप्नाविषयी संपूर्ण गावाला सांगितले. सगळे खूप खुश झाले. पुनाज गावात बरेच लोक गेले व तेथून तुपाचे दिवे घेऊन राधू गावाकडे निघाले. तो श्रावण महिना होता. पुनाज गाव राधूपासून 8 किलोमीटर अंतरावर होते. जोरदार पाऊस व वारा असूनही दिवा विझला नाही.

मग राधू गावात एक देहरी व छोटेसे मंदिर बांधून हा दिवा स्थापित करण्यात आला. तेव्हापासून येथे महादेवाची अखंड ज्योत तेवत आहे.