आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Only Clerks, Guards labourers Arrested.. 'Orewa' Along With Her MD And Officers Are Not Named In FIR

मोरबीच्या गुन्हेगारांना अभय:केवळ क्लार्क, गार्ड-मजुरांना अटक.. 'ओरेवा'सह तिचे MD व अधिकाऱ्यांचे नाव FIR मध्ये नाही

मोरबीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या मोरबीतील पुल कोसळल्याच्या अपघातील बळींचा आकडा 141 वर पोहोचला आहे. यात 50 हून अधिक मुलांचा समावेश आहे. मृत्युच्या या भयावह आकड्यामुळे अनेकांच्या काळजाचे पाणी होत असले तरी आता या घटनेतील खऱ्या गुन्हेगाराना वाचवण्याचा खेळ सुरू झाला आहे. पोलिसांनी सोमवारी या घटनेतील 9 जणांना अटक केली आहे. त्यात ओरेवाच्या 2 मॅनेजर, 2 मजूर, 3 सेक्युरिटी गार्ड व 2 तिकीट क्लर्कचा समावेश आहे.

पोलिसांच्या FIR मध्ये पुलाचे संचलन करून पैसे कमावणाऱ्या ओरेवा कंपनीचा कोणताही उल्लेख नाही. एवढेच नाही तर पुलाची दुरुस्ती करणाऱ्या देवप्रकाश सॉल्युशनचेही त्यात नाव नाही. पुलाची देखरेख करण्याची जबाबदारी मोरबी नगरपालिकेच्या अभियंत्याची आहे. पण त्याचेही यात नाव नाही. म्हणजे केवळ छोट्या कर्मचाऱ्यांवर या घटनेचे खापर फोडून सरकार स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

मोरबी पुल दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारीही घटनास्थळी बचाव मोहीम सुरू आहे.
मोरबी पुल दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारीही घटनास्थळी बचाव मोहीम सुरू आहे.

एका झटक्यात 141 जणांचा बळी घेणाऱ्या या भयंकर अपघाताची चौकशी 5 सदस्यी समितीने अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण केली. यावरून त्यांची लज्जास्पद कार्यतत्परता दिसून येते. चला तर मग मोरबी दुर्घटनेचे खरे गुन्हेगार कोण आहेत हे क्रमवारपणे पाहुया...

करारात नफ्यावर लक्ष्य, जबाबदारींपासून पळ

सस्पेंशन पुलाचे संचलन करणाऱ्या ओरेवा कंपनी व मोरबी नगरपालिकेत 6 मार्च 2022 रोजी करार झाला होता. त्याची कॉपी दिव्य मराठीकडे आहे. 300 रुपयांच्या बाँडवर झालेल्या या करारात नमूद करण्यात आले आहे की, तिकीट दरवाढ व पुलाच्या व्यावसायिक वापराच्या मुद्यावर सरकारी यंत्रणा कोणताही हस्तक्षेप करणार नाहीत. या 3 पानी करारपत्रात अपघात झाल्याच्या स्थितीत कोण जबाबदार असेल याचा कोणताही उल्लेख नाही.

तिकिटांची नियमबाह्य चढ्यादराने विक्री

मोरबी नगरपालिकेसोबतच्या ओरेवाच्या करारानुसार, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच पूल सुरू करणे अपेक्षित होते. या ब्रिजवर मार्च 2023 पर्यंत प्रौढांना 15 रुपये व मुलांना 10 रुपये तिकीट घेण्याची तरतूद होती. 2023-24 पासून दरवर्षी तिकीट दरात 2 रुपये वाढवण्याची तरतूद होती. पण ओरेवा पूल सुरू होताच कंपनीने स्वतःचे उखळ पांढरे करवून घेण्यासाठी प्रौढांना 17 व मुलांना 12 रुपयांचा तिकीट दर आकारला.

ओरेवाने अपघाताच्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी तिकीटांची भरमसाठ विक्री केली होती.
ओरेवाने अपघाताच्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी तिकीटांची भरमसाठ विक्री केली होती.

तिकिटांवर नगरपालिकेचे नाव नाही

नियमांनुसार, एखाद्या सरकारी संपत्तीचे खासगी कंपनीकडून संचलन केले जात असेल तर त्याचा मालकी हक्क सरकारी संस्थेकडे असोत. उदाहरणार्थ, महामार्गावरील टोल वसुली खासगी कंपन्या करतात. पण पावती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नावे जारी केली जाते. मोरबीच्या सस्पेंशन ब्रिजच्या प्रकरणात असे नव्हते. पुल व तिकीट या दोन्हींवरही नगरपालिकेचा उल्लेख नव्हता.

पुलाचा आधार असणाऱ्या अँकर पिनकडे दुर्लक्ष

मोरबी दुर्घटनेत तांत्रिक बाबतीतही घोर दुर्लक्ष झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तब्बल 2 कोटी रुपयांच्या खर्चातून पुलाच्या रंगरंगोटीचे काम करण्यात आले. पण संपूर्ण पुलाचा भार पेलणाऱ्या महत्वपूर्ण भागांकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे दरबारगडच्या बाजूने लावण्यात आलेली पुलाची अँकर पिन उपसली गेली व अपघात घडला.

अँकर पिन जमिनीत फिट केलेली असते. यामुळे झुलता पूल अधांतरी झुलत राहतो.
अँकर पिन जमिनीत फिट केलेली असते. यामुळे झुलता पूल अधांतरी झुलत राहतो.

अँकर पिनवरच झुलत्या पुलाच्या दोन्ही टोकांचा भार असतो. मोरबी पुलाच्या एका अँकर पिनची क्षमता 125 व्यक्तींची आहे. पण रविवारी 350 हून अधिक व्यक्तींना प्रवेश देण्यात आला. ठेकेदार व सरकारी अभियंत्यांनी हा पूल 140 वर्षे जुना असल्याकडे दुर्लक्ष केले. विशेषतः त्याचे अँकर पिन एवढे ओझे उचलण्यास सक्षम नसल्याचेही त्यांच्या लक्षात आले नाही.

7 महिने दुरुस्ती, 2 कोटींचा खर्च, पण पायाकडे दुर्लक्ष

झुलत्या पुलाच्या दोन्ही टोकांना 2 अँकर पिन होत्या. त्यावर पुलाचा सर्व भार होता. पण दुरुस्तीच्या कामात या महत्वाच्या अँकर पिनकडे दुर्लक्ष करण्यात आले. जुन्या पुलाचा पाया किती मजबूत आहे व त्यावर किती काम करण्याची गरज आहे हे दुरुस्ती करणाऱ्यांनी पाहिलेच नाही. त्यांनी केवळ रंगरंगोटीवर लक्ष दिले, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...