आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Morbi Bridge Accident Update; Ajanta Oreva, Renovation Cost, Morbi Latest News 

मोरबी पूलाच्या दुरुस्तीसाठी मिळाले होते 2 कोटी:ओरेवा कंपनीने केवळ 12 लाख खर्च केले; पटेल कुटुंबानेच केले होती फिटनेस टेस्ट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मोरबी पुलावर 30 ऑक्टोबरला अपघात झाला होता. यामध्ये 137 जणांचा मृत्यू झाला.

गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेच्या तपासात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येवू लागले आहेत. आता पुलाच्या दुरूस्तीसाठी ओरेवा कंपनीला 2 कोटींचा निधी देण्यात आला होता.

आता त्यात धक्कादायक बाब म्हणजे कंपनीने दोन कोटीतील निधीपैकी केवळ 6% म्हणजे केवळ 12 लाखांचा खर्च करून दुरूस्तीचे काम केले होते. यासाठी ओरेवा कंपनीने तब्बल सहा महिन्यांचा कालावधी दुरूस्तीसाठी घेतला होता. आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता.

केवळ सहा टक्के रक्कम देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी वापरण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. त्याचे कारण म्हणजेच उपकंत्राटदार देवप्रकाश सोल्युशन्स फर्मकडून पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. केवळ सहा टक्के खर्च करण्यात आल्याचे या कागदपत्रातून सिद्ध झाले आहे.

जयसुख पटेलांच्या कुटुंबियांनी केले होते उद्घाटन

ओरेवा कंपनीला मार्च 2022 मध्ये मोरबी पूलाच्या देखभाल दुरूस्तीचे काम 15 वर्षांच्या करारावर देण्यात आले होते. दरम्यान, ओरेवा कंपनीच्या वतीने देवप्रकाश सोल्युशन्सला पूल दुरुस्तीचे उपकंत्राट देण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर 24 ऑक्टोबरला ओरेवा ग्रुपचे अध्यक्ष जयसुख पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांनी फित कापून या पूलाचे उद्घाटन केले. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांनी पुलावर केवळ पायी चालण्याचा केवळ फार्स पूर्ण केला. आणि त्यालाच फिटनेस चाचणी म्हणून जाहीर केले.

सब-क्रॉन्ट्रक्टही तांत्रिकदृष्ट्या अक्षम होते
ओरेवा कंपनीने ज्या ध्रांगधारा फर्मला पुलाच्या दुरूस्तीसाठी काम दिले होते. मात्र, पुलाच्या दुरूस्ती करणारे हे उपकंत्राटदार देखील तांत्रिकदृष्ट्या अक्षम होते. फोरेन्सिक रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, पुलाच्या 4 केबल्स खूप जुन्या होत्या. त्यांच्यात घर्षण झाले. धक्कादायक म्हणजे दुरूस्ती दरम्यान, केबल्सचे ऑइलिंग-ग्रीसिंगही करण्यात आले नव्हते. पुलाच्या लाकडी पायाच्या जागी चार थर असलेल्या अ‌ॅल्युमिनियमचा पत्रा बसविण्यात आला. त्यामुळे पुलाचे वजन वाढले. जुन्या केबल्समुळे हा भार सांभाळता आला नाही. गर्दी वाढल्याने पूल ताडकन तुटला.

अँकर पिन जमिनीत बसतात आणि दोन्ही बाजूंनी झुलता पूल धरतात.
अँकर पिन जमिनीत बसतात आणि दोन्ही बाजूंनी झुलता पूल धरतात.

मोरबी पूल खुला झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत तो कोसळला होता. स्ट्रक्चरल ऑडीटर्सच्या तपासादरम्यान, असे आढळून आले की, यावेळी केबलला धरून ठेवलेल्या अँकर पिनची ताकद विचारात घेतली गेली नाही. जास्तीच्या वजनामुळे दरबारगड टोकावरील अ‌ॅंकरची पिन उखडून पूल एका बाजूला झुकून नदीत पडला होता. अँकर पिनची क्षमता 125 लोकांची होती, परंतु पुलावर एकाच वेळी 350 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली गेली. परिणामी एक पिन तुटली आणि लोक खाली पडले.

बातम्या आणखी आहेत...