आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरातमध्ये 6 महानगर पालिकेची मतमोजणी सुरू आहे. एकूण 576 जागांवर 21 फेब्रुवारीला मतदान झाले होते. यातील सर्व 6 अहमदाबाद, सूरत, राजकोट, वडोदरा, जामनगर आणि भावनगरमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळावली आहे. भाजपने 401 आणि काँग्रेसने 50 जागांवर विजय मिळवला आहे.
गुजरातमध्ये 6 महापालिका अहमदाबाद, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोटमध्ये मतदान झाले होते. अहमदाबादच्या नारायणपुरा सीटवर महिला उमेदवार बिंद्रा सूरती यांच्या समोर कोणताच उमेदवार नसल्यामुळे ही जागा भाजपने आधीच जिंकली होती. भाजप आणि काँग्रेसने या निवडणुकीला आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्व दिले आहे. गृहमंत्री अमित शहा संपूर्ण कुटुंबासह मतदानासाठी आले होते. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह कोणत्याच नेत्याने प्रचारात कमतरता ठेवली नव्हती.
सूरतमध्ये काँग्रेस तीन नंबरवर जाण्याचे कारण
सूरतमध्ये 2015 च्या तुलनेत यावेळेस काँग्रेसला जास्त फटका बसला आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले- पाटीदार आरक्षण समिती (पास) ने काँग्रेसचा विरोध केला होता. दुसरे- आम आदमी पार्टीने पाटीदार उमेदवारांना तिकीट दिले आणि त्याच क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार केला. यामुळेच आम आदमी पार्टीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या. भाजपनेही पाटीदार क्षेत्रांमध्ये रोड शो केले होते.
6 महापालिकेत 2,276 उमेदवार, सर्वाधिक भाजपचे
भाजपा- 577 काँग्रेस- 566 आप- 470 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- 91 इतर पक्ष- 353 अपक्ष- 228
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.