आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत 22 मार्च रोजी भरुचच्या भोलाव जीआयडीसीमध्ये स्थित नर्मदा पॅकेजिंग अँड आशापुरा ट्रेडिंग कंपनीला आग लागली होती. या प्रकरणी आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ही आग कंपनीच्याच एका सिक्युरिटी गार्डने लावली होती. त्याचे एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात गार्ड गोदाम पेटवून देताना दिसून येत आहे. या घटनेत कंपनीच्या मालकांचे जवळपास 11 कोटींचे नुकसान झाले आहे.
सीसीटीव्हीत दिसला आणखी एक व्यक्ती
यासंबंधीच्या माहितीनुसार, सीसीटीव्हीत दिसून येत आहे की, गार्ड एका स्कूटरवरून गोदामापर्यंत येतो. त्यानंतर तो प्लॅस्टिकच्या पोत्यांना आग लावून ते पेटवून देतो. गार्ड काही सेकंद तिथे थांबून आग भडकण्याची वाटही पाहतो. त्यानंतर स्कूटरनेच तेथून पोबारा करतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अन्य एक व्यक्तीही दिसून येत आहे. हा व्यक्ती कंपनीचा कर्मचारी असून, त्याचाही या घटनेत हात असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
3 दिवसांपूर्वीच जॉइन केली होती नोकरी
कंपनीच्या गोदामाला आग लावणारा आरोपी गार्ड मनोज बकरे याने 3 दिवसांपूर्वीच कंपनी जॉइन केली होती. त्यामुळे त्याने एवढ्या कमी कालावधीत का आग लावली हे अजून स्पष्ट झाले नाही. प्राथमिक चौकशीत आरोपीने काहीच सांगितले नाही. त्यामुळे पोलिस आता त्याची 4 दिवसांची कोठडी घेऊन याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
फायर ब्रिगेडच्या 20 हून अधिक गाड्यांनी आग आणली नियंत्रणात
प्लॅस्टिकच्या गोदामाला लागलेली आग एवढी भीषण होती की, ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या लावाव्या लागल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 8 तास लागले. आगीमुळे परिसरातील इतर कारखानेही दिवसभर बंद ठेवावे लागले. भरूचचे जिल्हा दंडाधिकारी, एसपी यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
15 किमीपर्यंत दिसत होता धूर
22 मार्च रोजी सकाळी 7 च्या सुमारास कंपनीच्या गोडाऊनला आग लागली. प्लास्टिक असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. गोदामातून निघणारा धूर 15 किमी अंतरावरूनही दिसत होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे भरूच नगरपालिका, जीएनएफसी, एनटीपीसी झानोर, आरती इंडस्ट्रीज, अंकलेश्वर अधिसूचित, पानोली इंडस्ट्रीज, दहेज आदींसह जिल्ह्यातील 20 हून अधिक अग्निशमन विभागाचे फायर टँकर जवानांसह घटनास्थळी दाखल झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.