आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेल म्हणाले - मोदींचा EWS बाबतचा निर्णय ऐतिहासिक:पाटीदार समाज भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करणार

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते हार्दिक पटेल यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला "प्रचंड बहुमत" मिळेल. पाटीदारांनी एकजूट दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 च्या निवडणुकीत हा मुद्दा वेगळा होता. 10 टक्के EWS कोट्याने गुजरातमधील पटेलांसह इतर वर्गातील गरीब आणि दलितांना आरक्षणाचा लाभ दिला आहे, असे म्हटले.

EWS कोट्याचा निर्णय हा 'ऐतिहासिक'

मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना पटेल म्हणाले की, EWS कोटा निर्णय हा 'ऐतिहासिक' निर्णय आहे. याचा फायदा 50 हून अधिक समाजातील गरिबांना होईल. आता केवळ पटेलच नाही तर इतर अनेक समाजांनाही आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. गेल्या वेळी पाटीदार आंदोलनाचा परिणाम सुमारे 20 जागांवर प्रत्यक्ष आणि अनेक जागांवर अप्रत्यक्षपणे झाला होता.

इतर समाजालाही आरक्षणाचा लाभ

तीन वर्षांतच काँग्रेसला सोडचिठ्ठी
तीन वर्षांतच काँग्रेसला सोडचिठ्ठी

2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेलने नंतर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वर्षी जूनमध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी आपली कारकीर्द खराब केल्याचा आरोपही हार्दिक यांनी केला. आता ते गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी कष्ट घेत आहेत.

भाजप हार्दिक पटेल यांच्या माध्यमातून 1.5 कोटी पाटीदारांना जोडणार

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजप पुन्हा एकदा हार्दिक यांच्या माध्यमातून राजकीय समीकरणे जुळवत आहे. गुजरातमध्ये पाटीदारांची लोकसंख्या दीड कोटीच्या आसपास आहे आणि जवळपास 70 विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत जाणून घेऊया की, हार्दिक पटेल यांच्या प्रवेशाचा भाजपला किती फायदा होईल? 2017च्या निवडणुकीत हार्दिकमुळे भाजपला फटका बसला होता का? गुजरातच्या निवडणुकीत पाटीदारांचे इतके महत्त्व का आहे? येथे वाचा पुर्ण बातमी

हार्दिकची काँग्रेसमधून निरोपाची कहाणी

पाटीदार आंदोलनाचा नेता आणि गुजरातचा युवा चेहरा हार्दिक पटेलने काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. हार्दिक हे गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदावर होते. दिव्य मराठीशी केलेल्या खास बातचीतमध्ये हार्दिकने काँग्रेसमधील त्रुटी आणि पुढे जाण्याचा मार्ग मोकळेपणाने बोलून दाखवला. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...