आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Smit Changela Struggle Story; Unable To Use Hands And Legs | Neurological Problem | Gujarat

जिद्दीची गोष्टहात-पाय काम करत नाहीत, नाकाने मोबाईल चालवतो:बारावीत तिसरा क्रमांक, 3 सरकारी नोकरीच्या ऑफर; UPSC चे लक्ष्य

नीरज झा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'माझा जन्म इतर सामान्य मुलासारखा झाला. जेव्हा मी तीन महिन्यांचा होतो तेव्हा माझ्या पालकांना कळले की मला न्यूरोलॉजिकल आजार आहे. मला हात पायांचा समतोल साधता येत नाही. सर्वात आधी माझ्या पायांनी काम करणे बंद केले, म्हणून मी व्हीलचेअरवर बसायला लागलो... नंतर माझे हात कामातून गेले.

मम्मी सांगते की जेव्हा मी लहान होतो आणि ती माझ्या अंगाला मसाज करायची तेव्हा माझे हात पाय वाकडे दिसायचे. ते सरळ होत नव्हते. त्यांनी गुजरात ते मुंबईपर्यंत असंख्य डॉक्टरांचा सल्ला घेतला… पण काहीच उपयोग झाला नाही. मला इतर मुलांप्रमाणे चालता किंवा खेळता येत नव्हते.'

मी माझ्या आई-वडिलांचा पहिलाच मुलगा आहे. माझे संगोपन योग्यरित्या झाले पाहिजे, म्हणून माझ्या पालकांनी दुसर्‍या मुलाचा विचारही केला नाही. मी दिव्यांग असूनही मी स्वतःला एक सामान्य मूल समजतो. मी नाक-ओठांनी मोबाईल चालवतो, ते बघून लोक थक्क होतात. सरकारी नोकऱ्यांच्या दोन-तीन ऑफरही आल्या आहेत, पण मला UPSC क्रॅक करायची आहे, त्यासाठी मी तयारी करत आहे.

दुपारचे दोन वाजले आहेत, सूर्य तळपत आहे. गुजरातमधील राजकोट येथे राहणारा स्मित चांगेला नुकताच कॉलेजमधून परतला आहे. पलंगावर दोन-तीन उशांवर मोबाईल ठेवलेला असून, त्याचे नाक आणि ओठ मोबाईल चालवत आहेत. इथेच मी त्याच्याशी बोलत आहे. स्मित सांगतो, 'पूर्वी मी माझा मोबाईल वापरायचो आणि चॅट करायचो. पण हाताने काम करणे बंद केल्याने टायपिंग करताना खांदा दुखू लागला.

हाच स्मित चांगेला, जो नाकाने मोबाईल वापरतोय. तो मॅसेज टाइप करत आहे.
हाच स्मित चांगेला, जो नाकाने मोबाईल वापरतोय. तो मॅसेज टाइप करत आहे.

स्मित जेव्हा आपले दोन्ही हात वर-खाली करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्यात जीव नसल्यासारखे वाटते. तो म्हणतो, 'हातामध्ये त्राण नसल्याने खूप त्रास झाला. काय करावे समजत नव्हते. एके दिवशी तो असाच बसला होता. नाकाने टाईप करण्याचा प्रयत्न करावा असे वाटले. जर एखाद्या सामान्य व्यक्तीने स्क्रीनजवळ आपले डोळे घेतले तर त्याला ते अस्पष्ट दिसते, तुम्ही देखील ते पाहा. पण जेव्हा मी हे केले तेव्हा मला सर्व काही दिसत होते.

मी माझ्या नाकातून टाईप करायला सुरुवात केली. माझ्या मित्रांनी ते पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. मी माझ्या नाकाने टायपिंग करणार्‍यांपेक्षा वेगवान आणि अचूक लिहितो. मी माझ्या ओठांनी मोबाईलचा स्क्रीन स्क्रोल करतो. समोरच्या व्यक्तीला हे कळणारही नाही की मी सामान्य पद्धतीने टाइप करत नाही.

तू पण लॅपटॉप चालवतोस का?- माझ्या या प्रश्नावर स्मितच्या शेजारी बसलेली त्याची आई लॅपटॉप उघडते आणि त्याला देते आणि स्मित नाकाने कीबोर्डवर टाईप करू लागतो. तो म्हणतो की, 'नाकातून मोबाईल आणि लॅपटॉप चालवणारा मी भारतातील पहिली व्यक्ती आहे. आता मला ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवायचे आहे.

स्मित चांगेला सोबत आई अनिलाबेन चांगेला कायम असते, त्या स्मितला प्रत्येक कामात मदत करतात.
स्मित चांगेला सोबत आई अनिलाबेन चांगेला कायम असते, त्या स्मितला प्रत्येक कामात मदत करतात.

स्मित सध्या ग्रॅज्युएशनला आहे. खोलीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह त्यांचा एक फोटो आहे, ज्यामध्ये स्मित व्हीलचेअरवर बसलेला आहे आणि सीएम पटेल यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला आहे.

स्मित म्हणतो, "गेल्या वर्षी, मी 12वी राज्य बोर्डाच्या परीक्षेत सामान्य मुलांमध्ये तिसरा क्रमांक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता."

"माझ्या कुटुंबाने मला कधीही 'अपंग' वाटू दिले नाही," स्मित संभाषणादरम्यान अनेक वेळा या वाक्याची पुनरावृत्ती करतो.

या छायाचित्रात, स्मित व्हीलचेअरवर आहे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या छायाचित्रात, स्मित व्हीलचेअरवर आहे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

स्मितची आई त्याला ड्रेस बदलायला मदत करतात. त्या म्हणतात की, 'त्याला आंघोळ घालणे, कपडे घालणे, अभ्यासाला नेणे यासह दैनंदिन काम मी सांभाळते.'

तुम्ही दुसऱ्या मुलाची योजना आखली नाही...?

माझ्या प्रश्नावर स्मितची आई थोडा वेळ नि:शब्द राहिली. इतक्यात स्मितचे वडीलही येतात.

त्या म्हणतात की, 'जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की स्मितला न्यूरो आजार आहे, त्याचे हात पाय भविष्यात काम करणार नाहीत. मग आम्ही विचार केला की जर मी दुसऱ्या मुलासाठी योजना आखली तर त्याच्याकडे नीट लक्ष्य देता येणार नाही. इतर दिव्यांग मुलांसोबत जसं घडते,, तसेच त्याच्या बाबतीतही घडेल.

तो लहानपणापासूनच वाचनात हुशार होता. त्याच्या उपचारासाठी आम्ही सर्व ठिकाणी भटकत होतो, तेव्हा बहुतेक न्यूरो पेशंटची मानसिक स्थितीही चांगली नसल्यांचे डॉक्टरांच्या ठिकाणी दिसायचे. या बाबतीत आम्ही भाग्यवान आहोत. स्मितला फक्त हात-पायांमध्ये त्राण नव्हता. तो समतोल राखू शकला नाही.

स्मित चांगेला त्याच्या पालकांशी संवाद साधताना.
स्मित चांगेला त्याच्या पालकांशी संवाद साधताना.

स्मितच्या आईला हिंदी कळते पण बोलता येत नाही. त्या फक्त गुजराती बोलतात. स्मित आणि स्मितचे वडील त्यांच्या शब्दांचे हिंदीत भाषांतर करुन सांगतात.

स्मितचे वडील सांगतात, 'मी 12वी पर्यंत शिकलो आहे आणि पत्नी 10वी पर्यंतच शिकलेली आहे, पण स्मितची अवस्था बघता आम्हाला माहित होते की जर आपण दुसऱ्या मुलाची योजना केली तर आपण त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकणार नाही.

घरातील सदस्यांनी देखील आम्हा दोघांवर दुस-या मुलाची योजना करण्यासाठी दबाव आणला नाही. त्यावेळी हा निर्णय घेतला नसता तर स्मित आज जे आहे ते बनला नसता. आज आम्ही स्मितचे आई-वडील म्हणून ओळखले जातो. हे स्मितचे आई-वडील असल्याचे सोसायटीतील लोक म्हणतात.

स्मितच्या वडिलांचे म्हणणे आहे की, स्मित कधीच बरा होऊ शकत नाही हे आम्हाला मान्य करावे लागले. पण आपल्या कौशल्यातून आणि अभ्यासातून आपण करिअर करू शकतो आणि इतरांसाठी प्रेरणा बनू शकतो, असा विचार आम्ही कधीच केला नव्हता.

या फोटोमध्ये स्मित त्याचे डझनभर पुरस्कार आणि प्रमाणपत्रे दाखवत आहे. त्याच्यासोबत त्याची आई आहे.
या फोटोमध्ये स्मित त्याचे डझनभर पुरस्कार आणि प्रमाणपत्रे दाखवत आहे. त्याच्यासोबत त्याची आई आहे.

स्मितची आई म्हणते, 'तो प्रत्येक वेळी त्याच्या वर्गात अव्वल असतो. बर्‍याच वेळा तो वेगवेगळ्या प्रकारच्या एक्स्ट्रा अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी झाला आहे आणि जिंकला आहे. त्याचे अभ्यासाचे टेबल आणि कपाटे पुरस्कार आणि यश प्रमाणपत्रांनी भरलेली आहेत.

स्मित म्हणतो, 'मी लहान असताना एक-दोनदा असे घडले की, माझ्या आजूबाजूचे लोक, लहान मुले, मला चिडवायचे. माझ्या असहायतेची चेष्टा करायचे, पण जसजसा मी मोठा होत गेलो, तसतसे माझ्या कर्तृत्वामुळे या सर्व गोष्टी दूर होत गेल्या. मला घरी सावत्र असण्यासारखी वागणूक मिळाली नाही. आज माझे मित्र माझ्यासोबत बसून अभ्यास करतात, मी त्यांना मार्गदर्शन करतो, परीक्षेच्या तयारीसाठी मदत करतो.

स्मितचे वय 5 वर्षांचे असतानाचे हे छायाचित्र आहे.
स्मितचे वय 5 वर्षांचे असतानाचे हे छायाचित्र आहे.

स्मितच्या बोलण्याच्या दरम्यान, त्याचे वडील म्हणतात, 'स्मितच्या कर्तृत्वाचा आणि प्रतिभेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, स्मितला परीक्षेत त्याच्यासोबत लेखक ठेवण्याची परवानगी आहे, जो कॉपी लिहितो आणि स्मित सांगत असतो.

तो आपले विषय लक्षात ठेवतो, ते आपल्या मनात ठवतो. तो जसा लेखकाला सांगतो, लेखक तसाच लिहितो. राज्य मंडळाच्या परीक्षेत त्याने अर्थशास्त्र आणि सांख्यिकीमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले तेव्हा आम्ही थक्क झालो. थिअरी लक्षात ठेवून लिहिता येते, पण प्रॅक्टिकल, ग्राफिक्स, चार्ट, टॅली… या सगळ्या गोष्टी लेखकाच्या मदतीने कॉपीवर फ्रेम करणे अवघड आहे, जे माझ्या मुलाने केले.

स्मितची आई त्याला व्हीलचेअरवर खेळायला घेऊन जात आहे.
स्मितची आई त्याला व्हीलचेअरवर खेळायला घेऊन जात आहे.

स्मित म्हणतो की, 'पूर्वी माझी आई मला शाळेत सोडायची, पण आता माझे मित्र मला घरातून शाळेत घेऊन जातात, घरी सोडायला येतात. मी नेहमी स्वतःला प्रेरित ठेवतो. मी दर वीकेंडला मित्रांसोबत हँग आउट आणि मजा करायला जातो. मी व्हीलचेअरच्या साहाय्याने चालत असलो तरी माझी इच्छाशक्ती मी कधीही कमी होऊ देत नाही.

आपल्या समाजात हेही पाहायला मिळते की, मुलगी झाल्यावरही लोक दुसऱ्या मुलाची वाट बघतात, मुलगा होण्याची वाट पाहत राहतात. पण मी अपंग असूनही माझ्या आईवडिलांनी असा विचार कधी केला नाही.

या फोटोमध्ये स्मित, त्याची आई, आजी आणि काकू आहेत.
या फोटोमध्ये स्मित, त्याची आई, आजी आणि काकू आहेत.

स्मितशी बोलताना तो फक्त 18 वर्षांचा आहे असे वाटत नाही. तो अनुभवी माणसाप्रमाणे बोलत असतो. तो म्हणतो, मला रोज डझनभर फोन येतात. बारावीत टॉप केल्यानंतर माझ्या काही मुलाखती प्रकाशित झाल्या, तेव्हा अनेक राज्यांतून फोन येऊ लागले.

या अपंग मुलांच्या व्यथा ऐकून मला धक्काच बसला. त्यांच्यासोबत काय वागणूक होते याचा विचार करायला हवा. त्यांना जनावरासारखे वागवले जाते. 25 वर्षांचे झाल्यानंतरही ते काहीही करू शकत नाही. त्यानंतर मी या लोकांना प्रेरित करायला सुरुवात केली.

स्मित सोसायटीतील मुलांसोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे.
स्मित सोसायटीतील मुलांसोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे.

स्मित सांगताे की, 'काही दिवसांपूर्वीची घटना आहे. एक मुलगी तिच्या कुटुंबासह माझ्या घरी आली. तिच्या कमरेखालचा भाग काम करत नव्हता. ती खूप निराश झाली होती. ती सांगत होती की, सगळे तिला चिडवतात, मी तिला प्रवृत्त केले की सांगितले की, हे लोकांचे कामच आहे… तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि करिअर करायला हवे.

स्मितची आई सांगते की, 'मला आठवते स्मितची परीक्षा होती आणि केंद्र तिसऱ्या मजल्यावर होतं. इमारतीत लिफ्ट नव्हती. अ‍ॅडमिनने सांगितले की आपण थोडा वेळ थांबू, पण वाट न पाहता स्मितला उचलून घेऊन मी तिसऱ्या मजल्यावर गेले.

अशा प्रकारे दररोज स्मितची आई त्याचा व्यायाम करून घेते.
अशा प्रकारे दररोज स्मितची आई त्याचा व्यायाम करून घेते.

स्मित स्वतःला उद्योजक म्हणवतो. तो म्हणताे, 'कोरोनादरम्यान मी असाच बसलो होतो. मला वाटायचे की मी काहीतरी व्यवसाय करावा, म्हणूनच मी ट्रेडिंग सुरू केले. मोठ्या प्रमाणात उत्पादने खरेदी करत होतो आणि त्यांची ऑनलाइन विक्री करत होतो. त्या सुमारे 8-9 महिन्यांत, मी 2-2.5 लाख रुपयांची कमाई केली.

मग मी शेअर बाजारातही गुंतवणूक करायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टी मी ऑनलाइन बघून शिकलो. वास्तविक, सध्या मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी माझा व्यवसाय थांबवला आहे. आता माझे लक्ष्य यूपीएससी आहे. मी समाजाला सांगू इच्छितो की धैर्य हे हात-पायांवर अवलंबून नसते.