आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Suspension Bridge Accident Updates, Morbi Bridge Anchor Pin Investigation Latest News,

अपात्र लोकांना पुलाचे काम दिल्याने 135 मृत्यू:लाकडांऐवजी अ‍ॅल्युमिनियम वापरले, भार वाढला, केबल बदलली नाही; म्हणूनच मोरबीचा पूल तुटला

मोरबी, गुजरातएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोरबीच्या झुलत्या पुलाची दुर्घटना नवीन फ्लोअरिंगमुळे घडली. नूतनीकरणाच्या नावाखाली पुलाच्या लाकडी पायाच्या जागी अ‍ॅल्युमिनियमच्या पत्र्यांचे चार थर लावण्यात आले. त्यामुळे पुलाचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले. जुन्या केबल्सना हा भार पेलता येत नसल्याने गर्दी वाढताच हा पूल कोसळला. गुजरात पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली आहे.

मोरबीमध्ये 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी झुलता पूल कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. त्यांना मंगळवारी मोरबी येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी सर्व आरोपींच्या कोठडीसाठी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुल कोसळण्याचे कारण सांगितले आहे. या घटनेत आतापर्यंत 135 जणांचा मृत्यू झाला आहे.

पूल दुर्घटनेप्रकरणी दीपक पारेख, दिनेश दवे, मनसुख टोपिया, मदेव सोळंकी, प्रकाश परमार, देवांग, अल्पेश गोहिल, दिलीप गोहिल, मुकेश चौहान यांना अटक करण्यात आली.
पूल दुर्घटनेप्रकरणी दीपक पारेख, दिनेश दवे, मनसुख टोपिया, मदेव सोळंकी, प्रकाश परमार, देवांग, अल्पेश गोहिल, दिलीप गोहिल, मुकेश चौहान यांना अटक करण्यात आली.

रिमांड अर्जात लिहिले - कंपनीने फक्त फ्लोअर बदलले

गुजरात पोलिसांनी मंगळवारी मॅजिस्ट्रेट कोर्टात पूल दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल दाखल केला. हा अहवाल सीलबंद कव्हरमध्ये सादर केला आहे. सरकारी वकील पांचाळ यांनी सुनावणीअंती सांगितले की, पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड अर्जात हे स्पष्ट लिहिले आहे की, पुलाच्या रचनेच्या बळावर दुरुस्तीचे काम झाले नाही. पुलाच्या फरशीतून फक्त लाकूड काढून अ‍ॅल्युमिनियमचे पत्रे बसवण्यात आले.

वजन वाढल्याने केबल तुटून लोक नदीत पडले

सरकारी वकील पांचाळ यांनी सांगितले की, फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या तपासणीत असे आढळून आले आहे की, ज्या चार केबल्सवर पूल आहे, त्या दुरुस्तीच्या सहा महिन्यांत बदलण्यात आल्या नाहीत. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, नवीन फ्लोअरिंगसह खूप जुन्या केबल्स लोकांचे वजन सहन करू शकल्या नाहीत आणि जास्त वजनामुळे केबल तुटल्या.

ज्या कंत्राटदारांनी दुरुस्ती करून घेतली, त्यांची पात्रता नव्हती

पुलाच्या दुरुस्तीचे काम ज्या कंत्राटदारांना देण्यात आले होते ते ते करण्यास पात्र नसल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यांना झुलत्या पुलाचे तंत्रज्ञान आणि संरचनेच्या मजबुतीबद्दल आवश्यक ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांनी केवळ पुलाच्या वरच्या सजावटीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच पूल तंदुरुस्त दिसत होता, पण आतून कमकुवत होता.

नदीत पूल कोसळल्यानंतर लोक दोरीला लटकून मदतीची याचना करतानाचे दृश्य.
नदीत पूल कोसळल्यानंतर लोक दोरीला लटकून मदतीची याचना करतानाचे दृश्य.

ज्यावर केबल आवळलेली होती, त्या अँकर पिन्सना पाहिलेही नाही

मोरबीच्या ऐतिहासिक पुलाचे सात महिन्यांत 2 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्याचा दावा करण्यात आला होता, परंतु तो सुरू होताच अवघ्या 5 दिवसांतच कोसळला. पुलावर अचानक लोकांची गर्दी झाल्याने ओव्हरलोडमुळे पूल कोसळला.

स्ट्रक्चरल अभियंत्यांनी या दुर्घटनेची चौकशी केली असता, असे आढळून आले की, दुरुस्तीदरम्यान केबल धरून ठेवलेल्या अँकर पिनच्या मजबुतीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळेच अतिभारामुळे पुलाच्या दरबारगड टोकावरील अँकरची पिन उखडून पूल एका बाजूने वाकून नदीत पडला.

अँकर पिन जमिनीत गाडलेल्या असतात. त्यांनी दोन्ही बाजूंनी झुलता पूल तोलून धरलेला असतो.
अँकर पिन जमिनीत गाडलेल्या असतात. त्यांनी दोन्ही बाजूंनी झुलता पूल तोलून धरलेला असतो.

अँकर पिन म्हणजे काय, त्याचे कार्य काय आहे?

कोणताही झुलता पूल ठेवण्यासाठी केबल दोन्ही बाजूंनी बांधलेली असते. यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना भक्कम पाया तयार करून मजबूत लोखंडी हूक बसविण्यात आले आहेत. ब्रिज केबल्स या हुकमध्ये घट्ट बांधल्या जातात आणि आवश्यकतेनुसार आवळल्या किंवा सैल केल्या जाऊ शकतात. या हुकांना अँकर पिन्स किंवा लंगर पिन्स म्हणतात.

पुलाच्या देखभालीकडे कुठे दुर्लक्ष झाले?

झुलत्या पुलाच्या नूतनीकरणाचे काम देवप्रकाश सोल्युशन्स यांना देण्यात आले होते. पुलाची रचना मजबूत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पुलाच्या अँकर पिनकडे त्यांनी दुर्लक्ष केले. 143 वर्षे जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या चार अँकर पिन किती मजबूत आहेत आणि त्या बदलण्याची गरज आहे का, यावर काम करण्याऐवजी संपूर्ण पैसा पुलाच्या सुशोभीकरणावर खर्च करण्यात आला.

पुलाच्या अँकर पिन किती मजबूत होत्या?

मोरबी पुलावरील अँकर पिनची क्षमता 125 लोकांची होती, मात्र रविवारी एकाच वेळी 350 हून अधिक लोकांना या पुलावर जाण्याची परवानगी देण्यात आली. हा पूल 143 वर्षे जुना असल्याचे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या लक्षातही आले नाही. अँकर पिन एवढा भार सहन करू शकल्या नाहीत. त्यामुळे गर्दीच्या वजनामुळे अशीच एक पिन तुटून लोक खाली पडले.

पूल कोसळत असतानाचे हे दृश्य आहे.
पूल कोसळत असतानाचे हे दृश्य आहे.

गुजरातचे शासक वाघजी यांनी उभारला होता पूल, इंग्लंडहून मागवले होते साहित्य

मोरबीचा हा पूल गुजरातमधील राजकोटपासून 64 किमी अंतरावर बांधला आहे. व्हिक्टोरियन लंडन शैलीत बांधलेला हा पूल मोरबीचे माजी शासक सर वाघजी यांनी बांधला होता. यासाठीचे साहित्य इंग्लंडमधून आयात करण्यात आले होते. मग तो युरोपमध्ये उपलब्ध सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून उभारला गेला.

बातम्या आणखी आहेत...