आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरण फुटले तेव्हा वाचली; पण आता नाही:मोरबी दुर्घटनेत मृत मुमताजची कहाणी; मुलगा म्हणाला- तेव्हा तिने ओढणीने 4 जणांना वाचवले

मोरबीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोरबी येथे 1979 ला मच्छू धरण फुटण्याची दुर्घटना घडली होती. मुमताज मकवाना (इनसेट) या त्या दुर्घटनाच्या साक्षीदार होत्या. मात्र, तब्बल काही वर्षानंतर मुमताज यांच्यावर मोरबी पूलाच्या घटनेत काळाने घाला घातला. मोरबीच्या 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूल दुर्घटनेत त्यांची सून शबाना आणि नातू आशद यांना देखील जीव गमवावा लागला.

ओढणीच्या सहाय्याने 4 जणांचे प्राण वाचविले होते

1979 मध्ये सलग एक आठवडाभर झालेल्या पावसामुळे मच्छू धरण फुटले. यानंतर मोरबीमध्ये एवढा पूर आला की, सुमारे 2 हजार लोक बुडाले. या दुर्घटनेच्या साक्षीदार तेव्हाच्या 19 वर्षीय मुमताज होत्या. यावेळी आपल्या दुपट्ट्याने त्यांनी 4 जणांचे प्राणही वाचवले होते.

4 दिवसांपूर्वी झालेल्या मोरबी पूल दुर्घटनेच्या वेळी मुमताज देखील हजर होत्या. मात्र यावेळी नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मुमताज यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांची सून आणि नातूही यात बुडाले. मुमताज यांच्या मुलाने आईच्या शौर्याची आणि माणुसकीची कहाणी सांगितली. धरण दुर्घटनेच्या आठवणीही त्याने शेअर केल्या. ज्यावर त्यांची आई त्यांना अनेकदा सांगत असे.

सिव्हिल हॉस्पिटलमधील मोरबी पूल दुर्घटनेतील मृतदेहांची रांग या घटनेची भीषणता सांगत आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधील मोरबी पूल दुर्घटनेतील मृतदेहांची रांग या घटनेची भीषणता सांगत आहे.

मुलगा बोलताना आईच्या धाडसाबद्दल सांगत होता
मोरबी पूल दुर्घटनेत तारिक यांची आई मुमताज तसेच त्यांची पत्नी शबाना व मुलगा आशद यांचा मृत्यू झाला आहे. ऑटोचालक व्यवसाय करणाऱ्या तारिक यांनी या दुर्घटनेने खचून गेल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, - पुलाच्या दुर्घटनेत मी सर्वांना गमावले आहे. त्याची भरपाई होणार नाही. यात आम्हाला न्याय हवा आहे. दोषींना शीक्षा झालीच पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली.

तारिक म्हणाले की, 11 ऑगस्ट 1979 रोजी मच्छू धरण तुटल्याने एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा माझी आई मुमताजचे नवीन लग्न झाले होते. संततधार पावसामुळे मच्छू धरण ओसंडून वाहत होते. दुपारी 3.15 वाजता धरण फुटले. 15 मिनिटांच्या आत संपूर्ण शहर पाण्यात बुडाले. दोन तासात घरे, इमारती जमिनीवर पडू लागल्या. लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. अशी माझी आई मला अनेकदा सांगत असे. तिने त्यावेळी तिघांना दुपट्ट्याचा आधार देत तिघांना वाचवले.

धरण दुर्घटनेनंतरचे हे चित्र सांगते की हा अपघात किती भयावह होता.
धरण दुर्घटनेनंतरचे हे चित्र सांगते की हा अपघात किती भयावह होता.

आईच्या शौर्याचा सर्वांना अभिमान होता

तारिक यांनी सांगिंतले की, आईच्या नातेवाईकांना तिचा अभिमान होता. तिच्या शौर्याची सर्वत्र चर्चा झाली. जेव्हा धरण फुटले तेव्हा आई आणि माझे वडील हबीब घराच्या छतावर चढले. त्याठिकाणी तीन दिवस थांबले. परिस्थिती निवळण्याची वाट पाहिली. नदीचे पाणी कमी झाल्यावर ते खाली आले. या अपघाताने त्यांची आर्थिक चणचण भासली. यातून सावरायला पालकांना खूप वेळ लागला."

1979 मध्ये 1439 लोक आणि 12,849 प्राण्यांचा मृत्यू झाला होता. धरण फुटल्याने सुमारे 100 कोटींचे नुकसान झाले होते.
1979 मध्ये 1439 लोक आणि 12,849 प्राण्यांचा मृत्यू झाला होता. धरण फुटल्याने सुमारे 100 कोटींचे नुकसान झाले होते.

मुमताज यांची हत्या करणारा मोरबीचा पूल

143 वर्षांपूर्वी मोरबीचे राजा वाघजी राव यांनी 1879 मध्ये हा पूल बांधला होता. पुलाची लांबी 765 फूट आणि रुंदी 4 फूट होती. मोरबीचा राजा प्रजावत्सल वाघजी ठाकोर यांच्या राजवटीत हा पूल बांधण्यात आला. मोरबी पुलावरूनच राजा राजवाड्यातून राजदरबारात जात असे.

बातम्या आणखी आहेत...