आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटआऊट अ‍ॅट वापी:गुजरातेत भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; मंदिराबाहेर कारमध्ये बसले होते, 3 गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू

वापी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील वापी जिल्ह्यातील राता तालुक्यात सोमवारी सकाळी भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाजपचे उपाध्यक्ष शैलेश पटेल पत्नीसह शिवमंदिरात पोहोचले होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. शैलेश यांना तीन गोळ्या लागल्या, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

कारच्या सीटवरच शैलेश पटेल यांचा मृत्यू झाला.
कारच्या सीटवरच शैलेश पटेल यांचा मृत्यू झाला.

पत्नीसोबत दर सोमवारी मंदिरात जायचे
शैलेश पटेल हे पत्नीसोबत दर सोमवारी शिवमंदिरात जात असत. आज सकाळी 7.15च्या सुमारास मंदिरात पोहोचले. दर्शनानंतर शैलेश त्यांच्या पत्नीची वाट पाहत गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले होते. दरम्यान, त्यांच्या कारजवळ एक दुचाकी थांबली आणि दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीने कारच्या खिडकीतून त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराच्या चार राऊंडमध्ये शैलेश यांना तीन गोळ्या लागल्या. गोळीबार केल्यानंतर आरोपी पळून गेले.

राता तालुक्यातील शिवमंदिरात ही घटना घडली.
राता तालुक्यातील शिवमंदिरात ही घटना घडली.

पत्नी मंदिरातून बाहेर आल्यावर कारच्या दारावर दिसले रक्त
घटनेनंतर सुमारे 15 मिनिटांनी पत्नी मंदिरातून बाहेर आली तेव्हा तिला कारच्या दारावर रक्ताचे डाग दिसले. शैलेश यांचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून त्या किंचाळल्या आणि बेशुद्ध पडल्या. मंदिरात उपस्थित भाविक त्यांचा आवाज ऐकला. स्थानिकही गोळा झाले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वापी जिल्ह्यातील भाजप नेत्यांचा ताफाही राता गावात पोहोचला आहे.

घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस.
घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस.

सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू
वापी जिल्हा आणि राता तालुका पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधात आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राता पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यात तिन्ही आरोपी दिसत आहेत. तालुक्यातील इतर सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन करण्यात येत आहेत.