आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाधारणपणे लोक लग्नाच्या वऱ्हाड, मिरवणुकीसाठी आलिशान कार, घोडी किंवा बग्गी वापरतात, मात्र आता लग्नासाठी जेसीबीवर मिरवणूक काढण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. गुजरातमधील नवसारी येथून असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे वऱ्हाडी जेसीबीमध्ये बसून लग्नमंडपात पोहोचले. लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वधूच्या बाजूचे लोकही हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले.
केयुर पटेल असे नवरदेवाचे नाव आहे. तो म्हणाला- प्रत्येकजण गाडी घेऊन येतो... मला काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून मी जेसीबी आणला. यूट्यूबवर पंजाबमधील एका लग्नाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही कल्पना सुचल्याचे त्याने सांगितले. घोडिया पटेल समाजातील या वराचा आदिवासी परंपरेनुसार विवाह झाला.
JCBमध्ये बसण्यासाठी सोफा ठेवला
नवसारी जिल्ह्यातील चिखली गावातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेसीबीला फुलांनी सजवल्याचे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. त्यात नवरदेवाला बसण्यासाठी सोफाही ठेवण्यात आला होता. याशिवाय जेसीबी रंगीबेरंगी मंडप कापडाने सजवण्यात आला होता.
यावेळी ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. वऱ्हाडींना पाहण्यासाठी लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती. काहींनी त्याचा व्हिडिओ बनवला तर काहींनी जेसीबीवर बसलेल्या वरासोबत सेल्फी काढला. दरम्यान, ढोल-ताशांच्या तालावर नाचत, गात मिरवणूक वधूच्या घरी पोहोचली.
नवसारी येथे प्रथमच वरातीसाठी जेसीबी बुक
मिळालेल्या माहितीनुसार, नवसारीमध्ये पहिल्यांदाच लग्नाच्या मिरवणुकीसाठी जेसीबी बुक करण्यात आल्याची घटना घडली आहे. मात्र, यापूर्वी देशातील इतर शहरांमध्येही अशा अनोख्या मिरवणुका पाहायला मिळाल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील बैतुल येथून असाच एक प्रकार उघडकीस आला होता, जेव्हा एक वर स्वत: जेसीबीवर बसून मिरवणूक घेऊन वधूच्या घरी पोहोचला होता. मित्रांसोबत जेसीबीवर डान्सही केला. राजगढ येथील टाटा कन्सल्टन्सीमध्ये काम करणाऱ्या सिव्हिल इंजिनीअर अंकुश जैस्वाल यांचा विवाह पढर येथील रहिवासी संजय मालवीय यांची मुलगी स्वाती हिच्याशी झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.