आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातच्या वडोदऱ्यातील 24 वर्षीय क्षमा बिंदू नामक तरुणीने बुधवारी स्वतःशीच लग्न केले. ती 11 जून रोजी लग्न करणार होती. पण, वाद टाळण्यासाठी तिने 3 दिवस अगोदरच लग्न केले. यावेळी हळद, मेहंदी आदी सर्वच पारंपरिक विधी झाले. एकटीने फेरे घेतले. आरशापुढे उभे राहून स्वतःच्या कपाळावर कुंकू लावले. स्वतःच मंगळसूत्रही घातले. लग्न लावून देण्यासाठी पंडित तयार झाला नाही. त्यामुळे तिने मोबाईलवर मंत्रोच्चार ऐकूण स्वतःचे लग्न लाऊन घेतले. पण, ती मागे हटली नाही.
वडोदऱ्याच्या गोत्री भागात राहणाऱ्या क्षमाच्या लग्नात तिचे काही खास मित्र सहभागी झाले. लग्नानंतर क्षमा मधुचंद्रासाठी गोव्याला जाणार आहे. तिथे ती 2 आठवडे थांबेल.
लग्न न करता नवरी होण्याची इच्छा होती
क्षमा या स्व-विवाहाविषयी म्हणते -'माझी लग्न करण्याची इच्छा नव्हती. पण, मला वधू म्हणजे नवरी व्हायचे होते. त्यामुळे मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कदाचित भारतात सेल्फ-लव्हचे उदाहरण घालून देणारी मी देशातील एकमेव मुलगी आहे.'
महिलाही महत्वाच्या आहेत
याविषयी क्षमता म्हणते -'लोक अशा प्रकारच्या विवाहाला अप्रासंगिक मानतील, परंतु मला स्त्रियांनाही महत्त्व हे सांगायचे आहे. लोक प्रेम असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे. त्यामुळे मी आत्मविवाहाचा पर्याय निवडला.'
पुण्याच्या कंपनीत नोकरी
बिंदू पुणे स्थित एका कंपनीच्या वडोदरा येथील आऊटसोर्सिंग कार्यालयात नोकरी करते. तिने यंदाच समाजशास्त्र विषय घेऊन एमएस विद्यापीठ-वडोदार येथून कला शाखेची पदवी (बीए) घेतली आहे.
आडनावाऐवजी ‘बिंदू’ शब्द
क्षमा मूळची केंद्र शासित प्रदेश दमणची आहे. पण, ती वडोदऱ्याच्या सुभानपुरा क्षेत्रात राहते. ती आडनावाऐवजी नावासोबत बिंदू हा शब्द वापरते. वेबसीरिजच्या एका डायलॉगमधील या शब्दाने आपल्याला प्रभावित केले, असे ती म्हणाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.