आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत 10 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारांमध्ये पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. यात भीमाभाई चौधरी यांना देवदर, जगमाल वाला यांना सोमनाथ, अर्जुन राठवा यांना छोटा उदयपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. राजकोट दक्षिणमधून शिवलाल बरसिया, राजकोट ग्रामीणमधून वशराम सगठिया यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी गुजरात दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी गुजरातेत आश्वासने दिली. केजरीवाल म्हणाले की, आज तुम्हाला गॅरंटी देत आहे की, जे बोलत आहे ते करून दाखवेन. त्यांनी म्हटले की, जर 5 वर्षांत बोललो तसे केले नाही तर धक्के मारून बाहेर काढा.
दिल्लीचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मी रोजगाराची गॅरंटी देत आहे. यासोबतच केजरीवालांनी आपल्या विरोधकांवरही निशाणा साधला. अरविंद केजरीवाल यांनी आपली गॅरंटी सादर करत 5 वर्षांच्या दरम्यान बेरोजगारांना रोजगार देण्याचे, रोजगार मिळेपर्यंत 3 हजार रुपये बेरोजगारी भत्ता, 10 लाख सरकारी नोकऱ्यांची भरती, पेपर लीकसाठी कठोर कायदा आणि सहकाराच्या क्षेत्रात नोकऱ्यांची पद्धत दुरुस्त करून ती पारदर्शक करण्याचे आश्वासन दिले आहे.
ते म्हणाले की, आज तुम्ही पाहाच, हे इतर पक्षांचे सर्व लोक टीव्ही चॅनलवर जाऊन मला दूषणे देतील की, 'केजरीवाल फुकटात रेवड्या वाटत आहे.' त्यांनी विरोधकांना निशाणा साधत म्हटले की, ही लोकं सर्व रेवड्या आपल्या मित्रांना वाटतात किंवा स्विस बँकेत नेतात. केजरीवाल जनतेत रेवडी वाटतो. अता नव्याने बुंदेलखंड एक्स्प्रेसमध्ये सुरू झाले होते, ते खराब झाले म्हणजे मग तीही मोफतची रेवडीच होती का? ते म्हणाले की, आता फक्त जनतेचीच फ्री रेवडी चालेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.