आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujrat Assembly Elections 2022 Updates । Congress 2nd List Of Candidates, So Far 89 Seats Have Been Announced, BJP List

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी:मध्यरात्री 46 उमेदवारांची नावे जाहीर; आतापर्यंत 89 जागा लढवण्याची घोषणा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसऱ्या यादीत राजकोट पूर्व आणि पश्चिम जागेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. - Divya Marathi
दुसऱ्या यादीत राजकोट पूर्व आणि पश्चिम जागेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 46 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यादीत 3 महिला आणि 4 मुस्लिमांची नावे आहेत. यादीत लिंबडी येथील कल्पना करमसीभाई मकवाना, डेडियापारा-एसटी येथील जर्माबेन सुखलाल वसावा आणि करंज येथील भारती प्रकाश पटेल यांचा समावेश आहे.

दुसऱ्या यादीत भुज येथील अर्जनभाई भुडिया, जुनागढ येथील भिखाभाई जोशी, सुरत पूर्व येथील अस्लम सायकलवाला, सुरत उत्तर येथील अशोकभाई पटेल आणि वलसाडमधील कमलकुमार पटेल यांचा समावेश आहे. यापूर्वी, पक्षाने गेल्या शुक्रवारी 43 नावांची पहिली यादी जाहीर केली होती. काँग्रेसने आतापर्यंत 89 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

दुसरीकडे, बराच वेळ विचारविनिमय केल्यानंतर भाजपनेही गुरुवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.

आता 46 उमेदवारांच्या नावांसह दुसरी यादी पाहा...

दोन दिवसांत काँग्रेसच्या तीन आमदारांचे राजीनामे

मात्र, गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा मार्ग सोपा असणार नाही. गेल्या दोन दिवसांत काँग्रेसच्या तीन आमदारांनी विधानसभेचे राजीनामे दिले आहेत. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील झालोद येथील काँग्रेसचे आमदार भावेश कटारा यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिला. मोहनसिंग राठवा आणि भगवान ब्रार यांच्यानंतर राजीनामा देणारे ते काँग्रेसचे तिसरे आमदार आहेत.

तलाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपने भगवानभाई धनाभाई ब्रार यांना तिकीट दिले आहे.

43 उमेदवारांची पहिली यादी

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसने 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. राज्यसभा सदस्य अमीबेन याज्ञिक, माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया आणि मुहवा येथील औद्योगिक प्रकल्पाविरोधात आंदोलन करणारे डॉ.कनुभाई कलसारिया यांच्या नावांचा त्यात समावेश आहे.

भाजपने 38 आमदारांची तिकिटे कापली

गुरुवारी जाहीर झालेल्या भाजपच्या पहिल्या यादीत विधानसभेच्या 180 जागांपैकी 160 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोधियातून निवडणूक लढवणार आहेत. घाटलोडिया हे राज्यातील हॉट सीट आहे. मुख्यमंत्री इथले भाजपचे आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या जागी डॉ. दर्शिता शाह राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...