आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात:यूपी-बिहारच्या स्पेशल ट्रेन्स रद्द झाल्यामुळे राजकोटमध्ये प्रवासी मजुरांकडून वाहनांची तोड-फोड

राजकोटएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रांसपोर्टचे साधन मिळत नसल्यामुळे शेकडो मजुर चालत घराकडे जात आहेत

शापर इंडस्ट्रिअल एरियात प्रवासी मजुरांनी रविवारी वाहनांची तोड-फोड केली. बिहार आणि उत्तरप्रदेशला जाणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेन्स रद्द झाल्यामुळे नाराज मजुरांनी गोंधळ घातला. रस्त्यावर मोठ-मोठे दगड ठेवून गाड्या अडवल्या आणि त्यांची तोड-फोड केली. राजकोट (ग्रामीण) चे एसपी बलराम मीणा म्हणाले की, या घटनेतील आरोपींवर लवकरच कारावई केली जाईल.

तिकडे, मध्यप्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील चकघाट परिसरात पोलिसांच्या उपस्थितीत मजुरांनी बॅरिकेड तोडले. मजुर उत्तरप्रदेशात जात होते. चकघाट उत्तप्रदेश-मध्यप्रदेश बॉर्डरवर आहे.

काही दिवसांपूर्वी सूरतमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता

घरी जाण्याच्या मागणीसाटी गुजरातमध्ये मजुरांकडून गोंधळ होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी 4 मे रोजी सूरतमध्ये अशीच घटना घडली होती. वरेली परिसरात घरी जाण्याच्या मागणीसाठी प्रवासी मजुरांनी रस्त्यावर उतरुन दगडफेक केली होती. घटनास्थळावर आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

मागच्या महिन्यात डायमंड बोर्समध्ये गोंधळ झाला होता

गुजरातच्या खाजोडमध्ये तयार होत असलेली आशियामधली सर्वात मोठी डायमंड बोर्समध्ये 28 एप्रिलला मजुरांनी गोंधल घातला होता. लॉकडाउनमध्ये काम करण्यावरुन मजुर नाराज होते. त्यांनी बोर्सच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली होती. 

बातम्या आणखी आहेत...