आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

135 मृत्यू झालेल्या मोरबीची जागा भाजपने राखली:कांतीलाल अमृतियांनी काँग्रेसच्या जयंतीभाईंना पराभूत केले

मोरबी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या पूल दुर्घटनेमुळे देशभरात चर्चेत आलेल्या मोरबी मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. पूल दुर्घटनेचा फटका भाजपला बसेल का? असा प्रश्न सर्वांना होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याचा अंदाज होता. मात्र पूल दुर्घटनेचा कसलाही परिणाम निवडणुकीवर दिसला नाही आणि भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम राखत ही जागा आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले.

अमृतियांचा दणदणीत विजय

कांतीलाल अमृतियांनी या जागेवरून काँग्रेसच्या जयंती पटेल यांचा पराभव केला. मोरबी पूल दुर्घटनेदरम्यान अमृतियांनी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मच्छू नदीत उडी घेतली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काँग्रेसमधून भाजपत आलेल्या विद्यमान आमदारांचे तिकिट कापले

विशेष म्हणजे या निवडणुकीच्या वेळी भाजपने विद्यमान आमदार ब्रिजेश मेरजांचे तिकिट कापत अमृतियांना उमेदवारी दिली होती. मेरजा हे 2018 मध्ये काँग्रेस सोडून भाजपत आले होते. तेव्हाच्या पोटनिवडणुकीत मेरजांनी काँग्रेसच्या जयंती पटेल यांचा 4649 मतांनी पराभव केला होता. तर त्यापूर्वीच्या 2017 मधील निवडणुकीत भाजपच्या कांतीलाल अमृतियांचा 3419 मतांनी पराभव केला होता.

या निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेससोबत आपच्या पंकज रणसारियांचेही आव्हान होते.

बातम्या आणखी आहेत...