आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात:परराज्यातील मजुरांनी केली तुफान दगडफेक, ६० अटकेत

सुरतएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सुरतच्या औद्योगिक भागात मजूर शनिवारी सकाळपासून रस्त्यावर उतरले होते. - Divya Marathi
सुरतच्या औद्योगिक भागात मजूर शनिवारी सकाळपासून रस्त्यावर उतरले होते.
  • लाॅकडाऊनमध्ये रस्त्यावर उतरले शेकडाे कामगार, राेखणे झाले कठीण

गुजरातच्या सुरतमध्ये पुन्हा परराज्यातील शेकडाे मजूर रस्त्यावर उतरले हाेते. मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करून शनिवारी मजुरांनी सकाळपासूनच हजिरा आैद्याेगिक क्षेत्रात आंदाेलन केले. काही मजुरांनी हिंसक मार्ग निवडला. त्यांनी दगडफेक केली.

काही मजुरांनी दगडफेक केल्यानंतर पाेलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फाेडल्या, त्याचबराेबर साैम्य लाठीमारही केला. अद्यापही या मजुरांना काेणत्या रेल्वेने व काेणत्या राज्यात पाठवायचे हे निश्चित झालेले नाही. पाच दिवसांपूर्वी त्यांनी नावांची नाेंदणी केली हाेती. परंतु आतापर्यंत त्यांना तिकीट मिळालेले नाही. त्याशिवाय जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली नसल्याचा मजुरांचा आराेप आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, आेडिशातील मजुरांचा या आंदाेलनात सहभाग हाेता. सुरतचे आयुक्त डी.एन. पटेल म्हणाले, पाेलिसांनी ६० निदर्शकांना अटक केली .

रेल्वेचे तिकीट देण्यास विलंब झाल्याची मजुरांची तक्रार

सुरतच्या आैद्योगिक भागात मजूर शनिवारी सकाळपासून रस्त्यावर उतरले होते.

हरियाणा : पायी येणाऱ्या मजुरांना आमच्याकडे ढकलू नका : मंत्री

अंबाला । पंजाबहून पायी येणारे शेकडाे मजूर हरियाणाच्या अंबाला सीमेवर येत आहेत. पाेलिसांसाेबत त्यांचा संघर्षही हाेत आहे. त्यावर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज म्हणाले, पंजाब सरकारने मजुरांसाठी याेग्य व्यवस्था करायला हवी हाेती. राज्याने त्यांना इकडे ढकलून लावायला नकाे हाेते. आम्ही धक्का मारू शकत नाही.

यूपी : फिराेजाबादमध्ये लाेकांनी स्मशानात अंत्यसंस्कार राेखले

फिराेजाबाद । उत्तर प्रदेशच्या फिराेजाबादच्या छारबागमध्ये नातेवाईक काेराेनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव घेऊन आल्यानंतर त्यास लाेकांनी विराेध दर्शवला. लाेकांनी काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर तेथील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली. काही लाेकांनी दगडफेकही केली. पाेलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...