आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujrat Morbi Bridge Survivor Story, If 9 year old Netra Had Not Cried, The Entire Family Would Have Drowned In The River

मोरबी पूल दुर्घटनेत मुलामुळे वाचला जीव:9 वर्षीय नेत्र रडला नसता तर अख्खे कुटुंब नदीत बुडाले असते

मोरबीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील मोरबीमध्ये रविवारी संध्याकाळी झुलता पूल कोसळून 134 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. या अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तर काही जण नशीबवान ठरले, जे अपघातापूर्वी नुकतेच पुलावरून उतरले होते. त्यांच्यामध्ये अमरेली येथे राहणारे सागर मेहता यांचेही एक कुटुंब आहे, जे अपघात होण्यापूर्वीच आपल्या मुलाच्या रडण्यामुळे पुलावरून खाली उतरले होते. पुढे वाचा, सागर यांनी सांगितलेली हकिगत...

सागरभाई (उजवीकडे) कुटुंबासोबत सेल्फी घेताना.
सागरभाई (उजवीकडे) कुटुंबासोबत सेल्फी घेताना.

घाबरून मुलगा रडायला लागला, म्हणून पुलावरून खाली उतरले

मोरबीच्या अपघाताच्या सुमारे अर्धा तास आधी झुलत्या पुलावर पोहोचले होते. आम्ही सगळे मस्ती करत होतो, पण पूल हादरल्यामुळे माझा लहान मुलगा नेत्र घाबरला आणि रडू लागला. यादरम्यान आम्ही सेल्फीही काढली. मुलाचे रडणे काही थांबले नाही, तेव्हा आम्ही खाली उतरून दुसऱ्या ठिकाणी गेलो.

जेमतेम 10 मिनिटे झाली असतील की आम्हाला पूल कोसळल्याची बातमी मिळाली. जेव्हा आम्ही ऐकले की पुलावरील सर्व लोक मच्छू नदीत पडले तेव्हा आम्ही हादरलोच, कारण त्या वेळी पुलावर किती गर्दी होती हे आम्ही स्वतः पाहिले होते.

मुलामुळे कुटुंब सुखरूप घरी पोहोचले.
मुलामुळे कुटुंब सुखरूप घरी पोहोचले.

सागरभाई हे मोरबी येथे नातेवाइकाच्या घरी आले होते

सागरभाई पुढे म्हणाले, रविवारची सुटी असल्याने मी पत्नी व दोन्ही मुलांसह मोरबी येथे राहणाऱ्या एका नातेवाइकाच्या घरी गेलो होतो. मग आमचा प्लॅन ब्रीजवर फिरायचा ठरला. दोन नातेवाईकही सोबत होते. अपघातानंतर अवघ्या 5 मिनिटांनी आम्हाला नातेवाइकांचे फोन येऊ लागले. त्यांच्याकडूनच पूल कोसळल्याची बातमी मिळाली. आम्ही पुलावरून उतरल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी हा अपघात झाला.

6 महिन्यांच्या नूतनीकरणानंतर 26 ऑक्टोबर रोजी हा पूल खुला करण्यात आला.
6 महिन्यांच्या नूतनीकरणानंतर 26 ऑक्टोबर रोजी हा पूल खुला करण्यात आला.

हा सेल्फी आयुष्यभर विसरणार नाही

सागरभाई सांगतात की, पुलावरून खाली उतरताच मी माझा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. काही नातेवाइकांनी तो पाहिलाही होता. तेव्हा त्यांना कळले की आम्ही झुलत्या पुलावर आहोत. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी लगेच आम्हाला फोन करायला सुरुवात केली. हा सेल्फी आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही, ज्यात धाकटा मुलगा रडताना दिसत आहे, त्याच्यामुळेच आज आम्ही जिवंत आहोत.

बातम्या आणखी आहेत...