आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gujrat News And Updates: Vijay Rupani Fell In A Dizzy Spell During Speech Due To Low Blood Pressure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंचावर बेशुद्ध झाले गुजरातचे मुख्यमंत्री:​​​​​​​भाषणादरम्यान चक्कर येऊन पडले विजय रुपाणी, ब्लड प्रेशर कमी झाल्याने तब्येत बिघडली

वडोदा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी रविवारी व्यासपीठावर भाषण देताना बेशुद्ध होऊन पडले. स्थानिक निवडणुकांच्या प्रचारासाठी ते वडोद्याच्या निजामपुरा येथे पोहोचले. त्यांचा मेळावा येथे होणार होता. तत्पूर्वी आयोजित सभेमध्ये मुख्यमंत्री कोसळले. त्यानंतर रॅली रद्द करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती ठीक आहे. रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना चक्कर आली. उपचारानंतर ते अहमदाबादला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या मेळाव्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या शेवटच्या भागात रुपाणी पडताना दिसत आहेत.

निवडणुकांसाठी सातत्याने प्रचार करत आहेत रुपाणी
राज्यातील स्थानिक निवडणुकांमुळे विजय रुपाणी खूप व्यस्त आहेत. एकामागून एक, ते अनेक निवडणूक सभांना उपस्थित राहत आहेत. डॉक्टरांच्या मते, थकवा आणि तणाव अचानक रक्तदाब कमी होऊ शकतो. फोटोमध्ये रूपाणी व्यासपीठावर खाली पडताना दिसत आहेत. लोक त्यांना सांभाळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...