आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujrat Over Speed Car Hit 12 On Footers For Ambaji Darshan Six Dead | Marathi News

गुजरातच्या अंबाजीत भीषण अपघात:देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या 14 भाविकांना कारने चिरडले, 7 जणांचा मृत्यू

अरावलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील अंबाजी येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. अंबाजी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या 14 भाविकांना भरधाव कारने चिरडले. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला तर 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना मोडासा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत आणि जखमी पंचमहाल जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

कारच्या खांबाला धडकल्याने अनेक जण थोडक्यात बचावले
समोरून कार भरधाव वेगात येत असल्याचे अपघातातून बचावलेल्या भाविकांनी सांगितले. दरम्यान कारचे नियंत्रण सुटले आणि पायी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या गर्दीत धडकली. कारने 14 जणांना धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळली. कार खांबावर आदळली नसती तर 10-12 पेक्षा जास्त भाविक त्याच्या कचाट्यात आले असते.

चालक 20 तास सतत गाडी चालवत होता
अपघातात 7 जणांचा मृत्यू झालेल्या इनोव्हा कारचा चालक 20 तास सतत गाडी चालवत होता. तो पुण्याहून उदयपूरला जात होता, झोप पूर्ण न झाल्याने त्याला डुलकी लागली. त्याची चूकच या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरली. अपघातानंतर चालकालाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याने स्वत: डॉक्टरांना ही गोष्ट सांगितली.

मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत
या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, अरावली जिल्ह्यातील मालपूरजवळ अंबाजी दर्शनासाठी जाणाऱ्या पादचाऱ्यांची ही घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना रु. 4 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...