आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर दौरा:गुपकार मॉडेलमध्ये तरुणांसाठी बंदूक, मोदी मॉडेलमध्ये आयआयटी,एम्स : शाह

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बारामुल्लात होता. या दरम्यान सभेत बोलताना मशिदीत अजान सुरू झाली. त्यामुळे त्यांनी आपले भाषण थांबवले. नंतर लोकांची परवानगी घेऊन भाषण पुन्हा सुरू केले. त्यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांच्यावर आरोप केला की ‘गुपकार आघाडी’ने अतिरेक्यांसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले होते. आधी हा दहशतीचा स्पॉट होता, आता पर्यटनाचा हॉटस्पॉट आहे. वाढत्या पर्यटनामुळे येथील अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. गुपकर मॉडेलमध्ये तरुणांसाठी दगड, बंद महाविद्यालये, बंदूक आहे आणि मोदी मॉडेलमध्ये तरुणांसाठी आयआयएम, आयआयटी, एम्स नीट आहे. त्यांना दगड नको आहेत. मतदारयादी तयार होताच पारदर्शक पद्धतीने निवडणुका होतील, असे शाह म्हणाले. शाेपियाँमध्ये चार अतिरेक्यांचा खात्मा : केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्यादरम्यान शोपियाँमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींत सुरक्षा दलांनी चार अतिरेक्यांचा खात्मा केला. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन स्थानिक अतिरेकी मारले गेले. दुसरी चकमक मुलू भागात बुधवारी सकाळी झाली. यात लष्कर-ए-तैयबाचा स्थानिक अतिरेकी मारला गेला.

बातम्या आणखी आहेत...