आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gupteshwar Pandey JDU Ticket Update: Former Bihar DGP Gupteshwar Pandey On Election Commission Over Bihar Assembly Election 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी डीजीपींची नजर राजकारणावर:​​​​​​​गुप्तेश्वर पांडेय म्हणाले - बिहारमध्ये कोठूनही निवडणूक जिंकू शकतो, 14 जागांवरुन मिळाली आहे ऑफर; निवडणूक आयोगाने हटवले असते तर अपमान झाला असता

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पांडेय म्हणाले - व्हीआरएसला सुशांत सिंह प्रकरणाशी जोडण्याची गरज नाही
  • माजी डीजीपी म्हणाले - माझ्याविरूद्ध असे वातावरण तयार झाले होते की निवडणूक आयोगाने मला हटवावे

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी डीजीपीच्या पदाचा राजीनामा दिला. सरकारनेही त्याला मंजुरी दिली. पांडे जदयूचे तिकिट घेऊन विधानसभा किंवा लोकसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान माजी डीजीपी यांनी राजकीय डावात अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. गुप्तेश्वर गुरुवारी म्हणाले- बिहारची जनता मला पसंत करते. मी कोठूनही निवडणूक जिंकू शकतो. मला 14 जागांवर निवडणूक लढवण्याची ऑफर येत आहे.

एखाद्या राजकीय पक्षामध्ये सामील होणे चुकीचे किंवा अवैध आहे का?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जदयूमध्ये सामील होण्याच्या प्रश्नावर गुप्तेश्वर म्हणाले- राजकारण करणे किंवा कोणत्याही राजकीय पक्षात सामिल होणे अवैध आहे का? यासंदर्भात सध्या काहीही बोलू शकत नाही. लवकरच मी माझ्या निर्णयाबद्दल सांगेन. माझ्या व्हीआरएसला अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात जोडण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले की मी जे काही केले ते बरोबर होते.

निर्दोष राहिले करिअर
एका प्रश्नाच्या उत्तरात गुप्तेश्वर म्हणाले- निवडणूक लढविण्यासाठी मी राजीनामा देणार आहे, अशी रोजच माझ्याविरुध्द अफवा पसरल्या जात होत्या. मला वादग्रस्त बनवले जात होते. निवडणुका समोर आहे. अशा परिस्थितीत, जर मी निवडणूक लढवली असती तर विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती आणि निवडणूक आयोगाने मला काढून टाकले असते तर माझा अपमान झाला असता. माझी 34 वर्षांची कारकीर्द निर्दोष राहिली आहे. माझ्या कारकिर्दीच्या अखेरीस मी त्यास खराब होऊ देऊ शकत नव्हतो. माझ्याविरूद्ध असे वातावरण तयार झाले होते की निवडणूक आयोगाने मला हटवावे. माझ्याविरूद्ध कट रचला गेला. म्हणून मी व्हीआरएस घेण्याचे ठरवले.

बातम्या आणखी आहेत...