आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar DGP Gupteshwar Pandey Next Inning; All You Need To Know Ahead Bihar Assembly Election 2020

मुलाखत:बिहारच्या डीजीपी पदावरुन व्हीआरएस घेतलेले गुप्तेश्वर पांडे म्हणाले - राजकारणातील एंट्रीवर एक-दोन दिवसात घेणार निर्णय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2009 मध्ये जेव्हा गुप्तेश्वर पांडेनी डीजीपी पदाचा राजीनामा दिला होता, मात्र तेव्हा ते लोकसभा निवडणूक लढू शकले नव्हते
  • जदयू पांडेय यांना बक्सर शहरी भागातील तिकीट किंवा आजुबाजूचे एखादे तिकीट देत जागा लढवू शकते

बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, निवडणुकीच्या वातावरणात त्यांना वादग्रस्त बनवण्यात आले होते. कारकिर्दीवर डाग लागू नये म्हणून त्यांनी त्यांची नोकरी सोडली आहे. राजकारणात येण्याविषयी ते एक-दोन दिवसात निर्णय घेणार आहेत. वाचा मुलाखतीतील प्रश्नांना गुप्तेश्वर यांनी काय उत्तरे दिली...

आपण राजीनामा का दिला?
पांडेय: मीडियात माझ्या बद्दल रोज बातम्या येत होत्या. हजारो माणसे फोन करत होती. राजीनामा देऊन निवडणूक लढवतील असे बोलले जात होते. आता निवडणुकीच्या वातावरणात तुम्ही एखाद्याला इतका विवादास्पद बनवाल, त्याला राजकीय चेहरा बनवाल, मग तो निवडणूक कशी लढेल? मी आयुष्यासह निःपक्ष होऊन काम केले आहे. आता मी माझ्या करिअरवर डाग लागू देऊ शकत नाही. यामुळे मी नोकरी सोडली.

राजकारणात केव्हा जाणार?
पांडेय : जेव्हा राजकारणात जाणार असेल तेव्हा मी सांगेल. सध्या निर्णय झालेला नाही. एक-दोन दिवसात निर्णय होईल.

राजकारणात आलात तर बक्सरमधून विधानसभा निवडणूक लढाल की, वाल्मीकिनगरमधून लोकसभा लढाल?
पांडेय : (समोर उभे असलेल्या लोकांकडे इशारा करत) हे बेगूसरायवरुन आले आहेत, म्हणत आहेत की, आमच्या येथून निवडणूक लढा. हे जहानाबादवरुन आले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आमच्याकडून निवडणूक लढा. मी निवडणूक लढवण्याविषयी कुठे काय बोललो आहे? माझ्यासारखी व्यक्ती नफा-तोटा पाहून काहीच ठरवत नाही. संघर्ष करुन इथपर्यंत पोहोचलो आहे. गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. आत्मा जे सांगेल ते मी करतो.

लोक मला विचारायचे की, निवडणूक कुठून लढत आहात. मी निःपक्ष होऊन निर्णय घेईल. तेव्हाही लोक त्याला वेगवेगळ्या चष्म्यातून पाहतील. मी करिअरच्या अखेरच्या काळात वादात का अडकू? यामुळे सरकारवर सोडून दिले आहे की, कुण्या दुसऱ्याला डीजीपी निवडा.

अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूवर काय सांगाल?
पांडेय: शिवसेना जे सांगत आहे ते सत्य आहे काय? शिवसेनेने कंगना रनोटसोबत काय केले? ते जे बोलतात ते सत्य आहे काय? मी सुशांतसाठी उभा राहिलो तर त्यांना त्रास होऊ लागला. जी केस संपली होती. ती पुन्हा जिवंत केली.

निवडणुकीपुर्वी पांडेंनी घेतली व्हीआरएस

बिहार सरकारने पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या ऐच्छिक सेवानिवृत्तीला (व्हीआरएस) मंजुरी दिली आहे. पांडे यांनी उगाच आपला राजीनामा दिलेला नाही असे म्हटले जात आहे. यावेळी ते प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकत आहे. कारण 2009 मध्ये त्यांनी राजीनामा दिल्यावर त्यांना लोकसभा निवडणूक लढवता आलेली नव्हती. त्यावेळी त्यांची भाजपशी अंतिम चर्चा झाली होती. आता दुधाने तोंड पोळल्याने आता गुप्तेश्वर पांडे हे ताकही फुंकून पितील. 2009 मध्ये त्यांनी राजीनामा देऊन मोठी रिस्क घेतली होती. तेव्हा त्यांच्या नोकरीचे जवळपास 11 वर्षे शिल्लक होते. यामुळे यावेळी त्यांनी कोणतीही जोखीम न घेता राजीनामा दिला आहे. जदयूने त्यांचे तिकीट फायनल केल्याचे वृत्त आहे.