आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gurdwara Started To Handle The Outstretched Breath, Started Supplying Free Oxygen, Helping From The Covid Test To The Last Rites; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली-एनआरसीमध्ये ऑक्सिजन लंगर:गुरुद्वाराने सुरु केला मोफत ऑक्सिजन पुरवठा; कोविड चाचणीपासून तर अंत्यसंस्कारापर्यंत मदत

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिवसांत 1000 पेक्षा जास्त लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा

देशात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने भयावह रुप धारण केले आहे. दररोज देशात तीन लाखांच्यावर कोरोना रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच स्तरांतून नकारात्मक बातम्या येत असताना काही लोक आणि संस्था या काळात लोकांना मदत करण्यात व्यस्थ आहेत. विशेष म्हणजे दिल्ली-एनआरसीमधील गुरुद्वाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत ऑक्सिजन वितरण करत आहे. एकीकडे लोक कोरोनापासून आपला जीव वाचवत आहे तर दुसरीकडे, काही लोक आपला जीव धोक्यात घालून दुसर्‍यांना मदत करत आहे. या परिस्थितीत तुम्हाला सकारात्मक ठेवण्यासाठी दिव्य मराठी अशाच लोकांना तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजची दुसरी पॉझिटिव्ह स्टोरी...

ऑक्सिजन सिलेंडर गंभीर रुग्णांना दिले जात आहे
ऑक्सिजन सिलेंडर गंभीर रुग्णांना दिले जात आहे

राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आणि अन्य अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. लोकांना उपचारांसाठी ऑक्सिजन बेड्स मिळत नाही आहे. दरम्यान, जर एखादा रुग्ण खाजगी रुग्णालयांत उपचार घेत असेल तर व्यवस्थापन कधी ऑक्सिजन संपल्याचा संदेश देईल याची शाश्वती नाही. लोकांना उपचार घेण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील गाझियाबादमधील इंद्रपुरम येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वाराने आपल्या पातळीवर तेथील लोकांना मोफत ऑक्सिजन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेथील गुरुद्वाराचे सेवादार कंवलजित सिंग उर्फ ​​मनु सिक्का म्हणाले की, आमचे ऑक्सिजन कंमाडर प्रत्येक क्षणी तत्पर आहेत. आमच्या शरिरात जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत आम्ही इतरांचे श्वास बंद होऊ देणार नाही.

गुरुद्वाराजवळ 500 ऑक्सिजन सिलेंडर
श्री गुरुसिंग सभा गुरुद्वाराच्या व्यवस्थापनाकडे 500 ऑक्सिजन सिलेंडर असून ज्याला गरज आहे अशाच रुग्णांना येथे लवकरात लवकर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिला जात आहे. दरम्यान, सर्व लोकांना ऑक्सिजन गुरुद्वारामध्ये येण्याची विनंती केली जात आहे. व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, सिलेंडर जर घरी नेले तर ते फक्त एकाच व्यक्तीच्या कामात येत असून त्याला गरज नसल्यास असेच पडून राहणार आहे. परंतु, ते सिलेंडर येथे असल्यास ताबडतोब दुसर्‍या गंभीर रुग्णांना देता येऊ शकते.

तीन दिवसांत 1000 पेक्षा जास्त लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा
सेवादार मनु सिक्का सांगतात की, ऑक्सिजन पुरवठ्याची मोहीम तीन दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली असून आतापर्यंत 1000 लोकांना याचा पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, यामधील 178 लोक असे होते की, ज्याचा ऑक्सिजन स्तर केवळ 30 पेक्षा कमी होता. जर ऑक्सिजन द्यायला थोडा उशीर झाला असता तर त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती. बाकी 788 लोकांचा ऑक्सिजन स्तर 60-70 होता. मनु सिक्का पुढे म्हणाले की, जो लोकांना येथे येणे शक्य आहे ते येतात आणि ज्यांना खरोखरच शक्य नाही अशा लोकांना आम्ही घरी जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा करीत असतो.

हेल्पलाइन नंबर सुरु केले
गाझियाबादमधील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वाराच्या व्यवस्थापनाने लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. 9097041313 यानंबर फोन करुन लोक ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणि कोविड चाचणी करण्यासाठी मदत मागू शकतात.

बातम्या आणखी आहेत...