आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषी:व्यवस्थापक हत्याप्रकरणीगुरमीत राम रहीम दोषी, सन 2002 मध्ये गोळी मारून केली होती हत्या

पंचकुला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि इतर चौघांना हत्या प्रकरणात सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले. डेराचे माजी व्यवस्थापक रंजित सिंह यांच्या हत्येच्या गुन्ह्याची शिक्षा १२ ऑक्टोबरला जाहीर होईल. १९ वर्षांपूर्वीची ही घटना होती. अन्य चार दोषींमध्ये किशनलाल, जसबीर सिंह, अवतार सिंह आणि सबदिल यांचा समावेश आहे. एका दोषीचा मृत्यू झाला आहे. सुनावणीदरम्यान राम रहीम आणि अन्य एका आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले.

तिघांना कोर्टात आणण्यात आले. प्रकरणातील बचावपक्षाचा युक्तिवाद १२ ऑगस्ट रोजी पूर्ण झाला. यानंतर शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायाधीश सुशीलकुमार गर्ग यांनी आरोपींना दोषी ठरवले. नुकतेच रंजित सिंह प्रकरण पंचकुला न्यायालयातून पंजाब, हरियाणा किंवा चंदीगडच्या सीबीआय न्यायालयात हस्तांतरित करण्याची याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळली होती. डेरामध्ये एका साध्वीशी कथित अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर रंजित सिंहचे राम रहीमशी मतभेद वाढले होते.

बातम्या आणखी आहेत...