आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशीख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी दिली आहे. यासोबतच त्याने शनिवारी सकाळी पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर खलिस्तानच्या समर्थनासह जी-20 देशांच्या प्रतिनिधींचे खलिस्तानमध्ये स्वागत असे स्लोगन लावले आहेत.
पन्नूने गृहमंत्री शहा आणि सीएम मान यांना खुले आव्हान दिले आहे. दहशतवादी पन्नू म्हणाला, यापूर्वी केंद्र आणि पंजाब सरकारने पंजाबमधील शेकडो घरांमध्ये पोलिस पाठवले होते. लोकांचा छळ आणि महिलांचा विनयभंग झाला. पंजाबच्या प्रत्येक घरात स्फोटके बनवले जात आहेत. त्यांना पाहिजे तेव्हाच याचा स्फोट होईल. यामध्ये गृहमंत्री शहा आणि सीएम मान यांचा राजकीय मृत्यू होईल.
पंजाब-हरियाणा खलिस्तानचा भाग
शंभू सीमेवर लिहिलेली घोषणा हा भारताला संदेश असल्याचे पन्नू म्हणाला. आता पंजाब आणि हरियाणा भारताचा भाग नसून तो खलिस्तान आहे. पन्नूने राज्यातील तरुणांना 15-16 मार्च रोजी G20 मध्ये येणार्या प्रतिनिधींना खलिस्तानचा संदेश देण्यासाठी एकत्र येण्यास सांगितले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठे आव्हान
दहशतवादी पन्नूच्या धमकीपूर्वीच पंजाबमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर 15 ते 17 मार्च दरम्यान पंजाबमधील सुरक्षेसाठी अमृतसरमध्ये 50 केंद्रीय पोलिस दलांना पाचारण करण्यात आले आहे. ज्यामध्ये 10 CRPF, 12 BSF, 10 ITBP, 10 SSB आणि 8 RPF च्या तुकड्या 15 ते 17 मार्चपर्यंत अमृतसरमध्ये राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.